India Playing XI vs Pakistan : हरभजन सिंगने निवडली प्लेइंग इलेव्हन; रोहितही विचार करणार नाही अशा खेळाडूंना ठेवले बाहेर 

India Playing XI vs Pakistan, T20 World Cup 2022 : भारत-पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबरला मेलबर्न येथे होणाऱ्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 11:06 AM2022-10-20T11:06:53+5:302022-10-20T11:07:23+5:30

whatsapp join usJoin us
India Playing XI vs Pakistan, T20 World Cup 2022 : Harbhajan Singh reveals his playing XI; no place for R Ashwin, Harshal Patel | India Playing XI vs Pakistan : हरभजन सिंगने निवडली प्लेइंग इलेव्हन; रोहितही विचार करणार नाही अशा खेळाडूंना ठेवले बाहेर 

India Playing XI vs Pakistan : हरभजन सिंगने निवडली प्लेइंग इलेव्हन; रोहितही विचार करणार नाही अशा खेळाडूंना ठेवले बाहेर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Playing XI vs Pakistan, T20 World Cup 2022 : भारत-पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबरला मेलबर्न येथे होणाऱ्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील बाबर आजमच्या संघाने बाजी मारून इतिहास घडविला होता. पाकिस्तानने प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतावर विजय मिळवला. त्यानंतर आशिया चषक २०२२ मध्ये IND vs PAK यांच्यात दोन सामने झाले आणि हिशोब १-१ असा बरोबरीत सुटला. त्यामुळे मागच्या वर्ल्ड  कपच्या पराभवाची परतफेड करण्यासाठी आजही भारतीय संघ आतुर आहे. रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनचा विचार करत असताना भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने पाकिस्तानविरुद्ध त्याचे अंतिम ११ शिलेदार निवडले.  

India Playing XI vs PAK: सराव सामना रद्द झाला, Rohit Sharma चा प्लान फसला; पाकिस्तानविरुद्ध दोन खेळाडूंच्या निवडीमध्ये कॅप्टन अडकला!

हरभजनने निवडलेल्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अपेक्षित खेळाडू आहेत, परंतु दोन  नाव अशी आहेत की ज्यांना वगळण्याचा विचार रोहितही करू शकत नाही. भज्जीच्या या संघात रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या सारखे खेळाडू आहेतच.  पण, आर अश्विन व हर्षल पटेल यांना त्याने संघात घेतलेले नाही. तो म्हणाला, हर्षल पटेलला मी प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही खेळवू शकत. दीपक हुडा व आर अश्विन यांनाही सुरुवातीच्या काही सामन्यांत संधी मिळणार नाही, असं मला वाटते.  

भज्जीने रिषभ पंतएवजी दिनेश कार्तिक याला प्राधान्य दिले आहेत. अश्विनच्या जागी अक्षर पटेलला संधी दिलीय. भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी यांच्यावर जलदगती गोलंदाजीची जबाबदारी असेल. अर्शदीप सिंग तिसरा जलदगती गोलंदाज भज्जीच्या संघात आहे.  

भारताची प्लेइंग इलेव्हन वि. पाकिस्तान 

  • रोहित शर्मा ( कर्णधार)
  • लोकेश राहुल
  • विराट कोहली
  • सूर्यकुमार यादव
  • हार्दिक पांड्या
  • दिनेश कार्तिक
  • अक्षर पटेल
  • युजवेंद्र चहल
  • भुवनेश्वर कुमार
  • मोहम्मद शमी 
  • अर्शदीप सिंग 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: India Playing XI vs Pakistan, T20 World Cup 2022 : Harbhajan Singh reveals his playing XI; no place for R Ashwin, Harshal Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.