India Playing XI vs SA, 2nd Test : टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत महत्त्वाचा बदल करणार; जोहान्सबर्गवर नव्या रणनीतीसह उतरणार

India Playing XI vs SA, 2nd Test : सेंच्युरियनवर विजयी पताका फडकावल्यानंतर भारतीय संघ वंडरर्स येथे दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 03:32 PM2022-01-01T15:32:02+5:302022-01-01T15:32:49+5:30

whatsapp join usJoin us
India Playing XI vs SA, 2nd Test : Umesh Yadav likely to get a look-in at Johannesburg in place of Shardul Thakur | India Playing XI vs SA, 2nd Test : टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत महत्त्वाचा बदल करणार; जोहान्सबर्गवर नव्या रणनीतीसह उतरणार

India Playing XI vs SA, 2nd Test : टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत महत्त्वाचा बदल करणार; जोहान्सबर्गवर नव्या रणनीतीसह उतरणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Playing XI vs SA, 2nd Test : सेंच्युरियनवर विजयी पताका फडकावल्यानंतर भारतीय संघ वंडरर्स येथे दाखल झाला आहे. दुसऱ्या कसोटीला ३ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे आणि ती जिंकून मालिका विजयाचा इतिहास घडवण्याची संधी टीम इंडियाला आहे. भारतीय संघानं शनिवारी वंडरर्सवर कसून सरावही केला. तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्यानंतरही भारतीय संघ दुसऱ्या लढतीत बदलासह मैदानावर उतरणार असल्याचे संकेत आहेत. 


विजयी संघात बदल करणे विराटला आवडत नाही, तरीही पहिल्या सामन्यातील काही खेळाडूंच्या कामगिरीनंतर कॅप्टन कोहली जोहान्सबर्ग कसोटीत बदल करू शकतो. या सामन्यात शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) च्या जागी उमेश यादव ( Umesh Yadav) प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. विराट कोहलीला संघात एक तरी जलदगती अष्टपैलू खेळाडू हवा असतो. त्यानं आघाडीच्या ६ फलंदाजांना थोडासा आधार मिळतो. शार्दूल ठाकूर हा सक्षम पर्याय आहे, परंतु आर अश्विनही ही भूमिका चोख निभावत आहे.

पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व विराट यांना वंडरर्सच्या खेळपट्टीवर अधिकचे गवत असण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुले उमेश यादवला संधी मिळू शकते. शार्दूलनं पहिल्या कसोटीत १६ षटकांत दोन विकेट्स घेतल्या आणि दोन डावांत मिळून १४ धावाच केल्या. उमेश यादवची चेंडी स्विंग करण्याची कला वंडरर्सवर टीम इंडियाच्या फायद्याची ठरू शकते.   .

२०१८मध्ये वंडरर्समध्ये भारतीय संघ चार जलदगती गोलंदाज आणि हार्दिक पांड्या याच्यासह मैदानावर उतरले होते. २०१३मध्ये आर अश्विन खेळला होता, परंतु ४२ षटकांत त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. २०१८मध्ये भारतानं  ६३ धावांनी कसोटी जिंकली होती. अशात अश्विनच्या जागी हनुमा विहारीचा सातवा फलंदाज म्हणून विचार केला जाऊ शकतो. 

भारताचा संभाव्य संघ ( India Probable Playing XI for Jo’burg Test:) - लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन/हनुमा विहारी, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज  
 

Web Title: India Playing XI vs SA, 2nd Test : Umesh Yadav likely to get a look-in at Johannesburg in place of Shardul Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.