वेलिंग्टन - विदेशात गेल्या तीन महिन्यांमध्ये विजयाचा आलेख उंचावणारा भारतीय संघ बुधवारी आपल्या अखेरच्या टप्प्यात न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय लढतीसह आणखी एक मालिका जिंकण्याच्या निर्धाराने पाऊल टाकणार आहे.
नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिल्यानंतर रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. आॅस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक दौऱ्यानंतर येथे वन-डे मालिका ४-१ ने जिंकणाºया भारतीय संघाची नजर न्यूझीलंडमध्ये प्रथमच टी-२० मालिका जिंकण्यावर केंद्रित झाली आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना सलामीवीर शिखर धवन म्हणाला, ‘आम्हीही मानव असून आम्हालाही विश्रांतीची गरज आहे. आम्ही विजयाची लय कायम राखत मालिका जिंकण्यास इच्छुक आहोत.’
गेल्या वन-डे मालिकेच्या माध्यमातून भारताला विश्वकप स्पर्धेस संघाचे संयोजन साधण्यासाठी मदत मिळाली. अद्याप काही स्थान रिक्त आहेत. टी-२० मालिकेच्या माध्यमातून संघव्यवस्थापन इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाºया विश्वकप स्पर्धेत संघाचे प्रतिनिधित्व कोण करणार याची चाचणी घेईल. युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतचा वन-डे मालिकेत सहभाग नव्हता. तो तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी व संघातील स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील राहील. अनुभवी महेंद्रसिंग धोनीचे टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. त्याने अखेरचा टी-२० सामना गेल्यावर्षी जुलैमध्ये खेळला होता.
दिनेश कार्तिकसाठीही ही चांगली संधी आहे. त्याने फिनिशर म्हणून चांगली कामगिरी केली आहे, पण अंतिम संघात त्याला स्थान पक्के करता आलेले नाही. अंबाती रायडूने पाचव्या वन-डेमध्ये ९० धावांची खेळी करीत आपली निवड निश्चित केली.
१९ वर्षीय शुभमान गिलने आपल्या प्रतिभेची झलक अखेरच्या दोन वन-डेमध्ये दाखविली. कोहलीच्या अनुपस्थितीत त्याला पुन्हा तिसºया स्थानावर संधी मिळू शकते. कृणाल पांड्या व वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलही संघात आहेत. धवनला गेल्या तीन वन-डे सामन्यांत चांगली कामगिरी करता आली नाही. तर वन-डे मालिका गमाविणारा यजमान संघ प्रतिष्ठा राखण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. वेस्टपॅक स्टेडियममध्ये रविवारी सुरुवातीला चेंडू स्विंग झाला होता. किवी गोलंदाज त्याचा लाभ घेण्यास उत्सुक असतील. ट्रेंट बोल्टला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. डॅरिल मिशेल व वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकनेर यांची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एम.एस. धोनी, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, शुभमान गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज.
न्यूजीलंड : केन विल्यिम्सन (कर्णधार), डग ब्रेसवेल, कॉलिन डि ग्रँडहोम, लोकी फर्ग्युसन, स्कॉट के, कॉलिन मुन्रो, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर, टीम सेइफर्ट, ईश सोढी, टीम साऊदी, रॉस टेलर, ब्लेयर टिकनर, जेम्स नीशाम.
सामना : भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजल्यापासून.
Web Title: India ready for T20 series win, First match today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.