कसोटी रँकिंगमध्ये भारत अव्वल स्थानी कायम, आॅस्ट्रेलिया 5व्या स्थानी

भारत आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये पहिल्याप्रमाणे अव्वल स्थानी कायम आहे; परंतु आॅस्ट्रेलिया आज बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत राहिल्यामुळे एका क्रमांकाने घसरून पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:47 AM2017-09-08T00:47:43+5:302017-09-08T00:47:57+5:30

whatsapp join usJoin us
 India retains top position in Test rankings, Australia ranks 5th | कसोटी रँकिंगमध्ये भारत अव्वल स्थानी कायम, आॅस्ट्रेलिया 5व्या स्थानी

कसोटी रँकिंगमध्ये भारत अव्वल स्थानी कायम, आॅस्ट्रेलिया 5व्या स्थानी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : भारत आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये पहिल्याप्रमाणे अव्वल स्थानी कायम आहे; परंतु आॅस्ट्रेलिया आज बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत राहिल्यामुळे एका क्रमांकाने घसरून पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
भारताने नुकत्याच कसोटी मालिकेत श्रीलंकेला त्यांच्या भूमीवर ३-० असे पराभूत केले होते. आता त्यांचे १२५ गुण आहेत.
आॅस्ट्रेलियाचे आता न्यूझीलंडच्या बरोबरीने ९७ गुण आहेत; परंतु दशांशच्या गणनेनुसार ती पिछाडीवर आहेत. त्यामुळे त्यांची एका क्रमांकाने घसरण झाली आहे. न्यूझीलंड चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आॅस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सेडवली.

Web Title:  India retains top position in Test rankings, Australia ranks 5th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.