कोरोना व्हायरस भारतात डोकं वर काढत असताना दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ टीम इंडियाचा मुकाबला करण्यासाठी दौऱ्यावर आला होता. पण, देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि तीन सामन्यांची मालिका रद्द करावी लागली. त्यामुळे तीन वन डे सामन्यांची मालिका रद्द करण्यात आली. मालिकेतील पहिला वन डे सामना पावसामुळे रद्द झाला होता त्यानंतर आफ्रिकेचा संघ लखनौ येथे दुसरा सामना खेळणार होते. पण, या कालावधीत बॉलिवूड गायिका कनिका कपूर ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तेथेच आफ्रिकेचे खेळाडूही होते. कनिकाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आफ्रिकेच्या खेळाडूंवरही कोरोनाचं संकट होतं. या 15 खेळाडूंचा वैद्यकीय अहवाल गुरुवारी समोर आला.
कनिका कपूरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्या काळात तिनं लखनौ येथे एका पार्टीत सहभाग घेतला होता. त्यामुळे तिचा वैद्यकिय अहवाल समोर आल्यानंतर पार्टीत उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याच काळात आफ्रिकेचा संघही त्याच हॉटेलमध्ये थांबला होता. त्यामुळे आफ्रिकेच्या खेळाडूंना कोरोनाची लागण होते की काय अशी भीती व्यक्त केली जात होती.
वन डे मालिका रद्द झाल्यानंतर आफ्रिकेचा संघ मायदेशात परतला आणि मायदेशात पोहोचल्यानंतर सर्व खेळाडू 14 दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये गेले. त्यांनी हे 14 दिवसांचे आयसोलेशन पूर्ण केले आणि एकाही खेळाडूमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली नाही. या सर्व खेळाडूंचे अहवाल नेगेटिव्ह आल्याची माहिती संघाचे वैद्यकिय प्रमुखे डॉ. शुएब मांजरा यांनी दिली. पण, या खेळाडूंच्या फिटनेसवर आता लक्ष ठेवावे लागणार आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
केव्हीन पीटरसन-विराट कोहलीची चर्चा सुरू असताना अनुष्कानं ऑर्डर सोडली अन्...
भारताच्या फिरकीपटूचे समाजकार्य, 350 गरीब कुटुंबांना मदत करण्याचा निर्धार
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉलवरून गांगुली, तेंडुलकर, कोहली, सेहवागशी संवाद साधणार
अजिंक्य रहाणेकडून राज्य सरकार अन् महानगरपालिकेच्या 'त्या' उपक्रमाचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रीडापटूंना सांगितले 'पाच' मंत्र, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन
इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी; पंतप्रधान मोदींच्या आजच्या आवाहनानं खरी ठरली?