Join us

टीम इंडियानं पहिल्यांदाच साधला ४०० पारचा डाव! सर्वोच्च धावसंख्या उभारत ऑस्ट्रेलियाला टाकले मागे; इथं पहा रेकॉर्ड

भारतीय महिला संघानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पार केला ४०० धावांचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 15:59 IST

Open in App

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघानं राजकोटच्या मैदानात आयर्लंड विरुद्धची लढाई चारशे पारची केलीये. भारतीय महिला संघानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ४०० धावांचा आकडा पार केला आहे. आयर्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना सलामीच्या बॅटर्संनी धमाकेदारी खेळी केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

भारतीय महिला संघाची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या

याआधी भारतीय महिला संघाची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या ही ३७० धावा अशी होती. १२ जानेवारी २०२५ रोजी राजकोटच्या मैदानात रंगलेल्या ऑयर्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघाने निर्धारित ५० षटकात ५ बाद ३७० धावा केल्या होत्या. आयर्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय संघानं  ४०० पारचा आकडा पार करत महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासातील संघाची सर्वोच्च धावसंख्या उभारली.

प्रतीका-स्मृतीचा धमाका; भारतीय महिला संघानं उभारली वनडेतील चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या

प्रतीका रावल १५४ (१२९) आणि स्मृती मानधना १३५ (८०) यांनी  केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघानं निर्धारित ५० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर ४३५ धावा लावल्या. भारतीय महिला संघाची वनडेतील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. एवढेच नाही तर महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच संघांमध्ये भारतीय संघाची एन्ट्री झाली आहे. 

न्यूझीलंड महिला संघाच्या नावे आहे ४०० पारचा 'चौकार' मारण्याचा विक्रम 

महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडच्या संघाने सर्वाधिक चार वेळा ४०० पेक्षा अधिक धावसंख्या उभारल्याचा विक्रम आहे. वनडेतील पहिल्या तीन सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड हा देखील न्यूझीलंडच्या नावे आहे. त्यानंतर या यादीत भारतीय संघाचा नंबर लागतो. या दोन संघांशिवाय ऑस्ट्रेलिया महिला संघाने वनडेत चारशे पार धावसंख्या उभारली आहे.

महिला वनडे क्रिकेटमध्ये चारशे पार धावसंघ्या उभारणारे संघ

  • न्यूझीलंड ४९४/१ विरुद्ध आयर्लंड, डब्लिन (२०१८)
  • न्यूझीलंड ४५५/५ विरुद्ध पाकिस्तान, क्राइस्टचर्च (१९९७)
  • न्यूझीलंड ४४०/३ विरुद्ध आयर्लंड, डब्लिन (२०१८)
  • भारत ४३५/५ विरुद्ध आयर्लंड, राजकोट (२०२५)
  • न्यूझीलंड ४१८ विरुद्ध आयर्लंड, डब्लिन (२०१८)
  • ऑस्ट्रेलिया ४१२/३ विरुद्ध डेन्मार्क, मुंबई (१९९७)

 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघस्मृती मानधनाभारतीय क्रिकेट संघ