नवी दिल्लीः आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी जाहीर करण्यात येईल असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांगितले. मुंबईत होणाऱ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येईल. निवड समिती सदस्य एमएसके प्रसाद, सरणदीप सिंग आणि देवांग गांधी यांची बैठक होणार आहे.
आशिया चषक स्पर्धेकरिता बांगलादेशने आपला संघ जाहीर केलेला आहे. ही स्पर्धा 15 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहे. भारताला अ गटात पाकिस्तानचा सामना करावा लागेल, तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्ताना यांना ब गटात स्थान देण्यात आले आहे. अ गटातील अन्य संघ पात्रता फेरीतीन निकालानंतर ठरतील. त्या शर्यतीत संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, ओमान, नेपाळ, मलेशिया आणि हाँगकाँग आहेत.
महेंद्रसिंग धोनीला यष्टिरक्षक म्हणून पहिली पसंती असेल, तर राखीव यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याशियाव तंदुरूस्त भुवनेश्वर कुमारचेही संघात पुनरागमन होऊ शकते. गोलंदाजीत भुवीसह जस्प्रीत बुमरा आणि उमेश यादव यांच्यावर मदार असेल. फिरकीत कुलदीप यादव व युझवेंद्र चहल यांना संधी मिळेल.