- अयाझ मेमन (कन्सल्टिंग एडिटर लोकमत)
भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यानंतर लगेचच मैदानावर उतरला व विजयही मिळविला. अशा मोठ्या प्रवासानंतर जेट लॅगची समस्या उद्भवू शकते. भारतीय खेळाडूंनी या गोष्टीवर प्रकाशझोत टाकला.
विराट कोहलीने सामन्यानंतरच्या दौऱ्याच्या वेळापत्रकावर टीका केली. मात्र, जेट लॅगसारख्या बाबी कामगिरी उंचावण्यासाठी सबब ठरू शकत नाहीत, असेही तो म्हणाला. संघातील सर्वच खेळाडूंना याची जाणीव असल्याचेही त्याने सांगितले.
पूर्वी संघाची कामगिरी खालावली तर अशी काही कारणे दिली जात असत. प्रशासन व प्रसारमाध्यमेही अशा बाबींवर जास्त भर देत असे. अनेक खेळाडू आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नसला की ही कारणे पुढे करून आपल्या सामान्य कामगिरीचा तर्कसंगत बचाव करीत असे. आज जगभरातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय व घरगुती क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमांसाठी आपले मन व शरीर वेगाने परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागणार, हे निश्चित करायला हवे.
क्रिकेटचे हे व्यस्त वेळापत्रक खेळाच्या भवितव्यासाठी चांगले आहे की नाही हे पुन्हा तपासून पाहावे लागगणार आहे. मात्र, हे स्विकारा किंवा बाहेर पडा हेच आता या खेळाचेच सूत्र बनले आहे. भारतीय खेळाडूंवर अनेकदा ते तापट असल्याचा आरोप केला जात आहे. ड्रेसिंग रूम कल्चर सुधारण्यासाठी व खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्याचे श्रेय सहाय्यक कर्मचारी व कर्णधार कोहली व शास्त्री यांनाच जाते.
भारतीय खेळाडूंची मानसिकता या दौºयातील पहिल्या सामन्यात प्रतिबिंबित झाली. दोनशेहून अधिक धावांचा पाठलाग करताना भारतीय खेळाडूंचा चमकदार खेळ अनुभवायला मिळाला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आक्रमक कामगिरीमुळे विजय निश्चित झाला. भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत महत्त्वाची आघाडी मिळविली. ही मालिका जिंकणे भारतासाठी अत्यंत सोपे असेल असे नाही. पहिला सामना तुल्यबळ झाला; मात्र न्यूझीलंडला त्यांचा अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्टची उणीव जाणवली.
Web Title: India should increase fieldwork
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.