असुरक्षित असेल तर भारतात टी-२० विश्वचषक होऊ नये

पॅट कमिन्स : यूएई हा उत्तम पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 01:12 AM2021-05-08T01:12:41+5:302021-05-08T01:13:22+5:30

whatsapp join usJoin us
India should not host T20 World Cup if it is insecure | असुरक्षित असेल तर भारतात टी-२० विश्वचषक होऊ नये

असुरक्षित असेल तर भारतात टी-२० विश्वचषक होऊ नये

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

माले (मालदिव) : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता भारतात आगामी आयसीसी टी-२० विश्वचषकाचे आयोजन करू नये. त्याऐवजी यूएई हा उत्तम पर्याय असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने व्यक्त केले आहे.

बायोबबल फोडून कोरोनाने शिरकाव केल्याचे लक्षात येताच आयपीएलचे उर्वरित ३१ सामने मंगळवारी तात्काळ प्रभावाने अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले. यामुळे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक आयोजनावरदेखील प्रश्नचिन्ह लागले आहे. त्यावेळी भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘मागच्या वर्षी यूएईत आयपीएलचे शानदार आयोजन झाले. त्यावेळी भारतात हे आयोजन व्हावे, असे मत लाखो लोकांनी मांडले होते. दोन्ही बाजूंचा विचार करून आयोजकांनी यंदा भारतात हे आयोजन केले असावे. 
जे घडले त्यापासून बोध घेत सर्वांचा सल्ला विचारात घेऊनच पुढील स्पर्धा आयोजित करण्याचा विचार व्हावा’, असा सल्ला कमिन्सने बीसीसीआयला दिला.

n येथील ‘एज’ या वृत्तपत्राला मुलाखत देताना कमिन्स म्हणाला, ‘कोरोना भारतातील उपाययोजनांवर डोईजड ठरत असल्यास विश्वचषकाचे आयोजन करणे सुरक्षित होईल, असे वाटत नाही. 
n कोरोना थोपविण्यासाठी उत्कृष्ट उपायांची गरज आहे. भारत सरकारसोबत क्रिकेट अधिकाऱ्यांनी संवाद साधायला हवा. त्यानंतरच सर्वोत्कृष्ट निर्णय घेतला जाऊ शकतो. 
n स्पर्धेसाठी सहा महिने शिल्लक असल्याने काही भाष्य करणे अतिघाईचे ठरेल. लोकांच्या हितासाठी काय सर्वोत्तम पर्याय ठरेल, याविषयी सल्लामसलत केल्यानंतरच आयोजनाचा निर्णय व्हायला हवा.’
 

Web Title: India should not host T20 World Cup if it is insecure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.