IND vs SA 1st ODI: अखेर टॉसची वेळ ठरली! मात्र षटके झाली कमी, जाणून घ्या नवीन अपडेट

आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरूवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 03:03 PM2022-10-06T15:03:43+5:302022-10-06T15:04:42+5:30

whatsapp join usJoin us
India-South Africa 1st ODI will be 45 overs due to rain  | IND vs SA 1st ODI: अखेर टॉसची वेळ ठरली! मात्र षटके झाली कमी, जाणून घ्या नवीन अपडेट

IND vs SA 1st ODI: अखेर टॉसची वेळ ठरली! मात्र षटके झाली कमी, जाणून घ्या नवीन अपडेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रांची : आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरूवात होत आहे. पावसाच्या विलंबामुळे उशिराने सामन्याला सुरूवात होत आहे. सध्या तरी पावसामुळे खेळ थांबला असून पाऊस थांबल्यावर नाणेफेक होईल असे बीसीसीआयने सांगितले आहे. लक्षणीय बाब म्हणजे पावसाच्या विलंबामुळे आजचा सामना 50 षटकांचा नसून 45 षटकांचा होणार आहे. पावसाच्या विलंबामुळे नाणेफेक आणि सामन्याची वेळ अर्ध्या तासाने पुढे ढकलण्यात आली होती. मात्र पावसाची उघडझाप सुरूच असल्याने 1.30 वाजता होणारी नाणेफेक झाली नसून 3.30 वाजता नाणेफेक होणार आहे. 

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ - 
शिखर धवन (कर्णधार),  श्रेयस अय्यर ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रजत पाटिदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर. 

एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ - 
टेम्बा बवुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रीक्स,  हेनरिच क्लासेन, केशव महाराज, येनमन मलान, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, एडिल फेहलुकवायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक 
पहिला एकदिवसीय सामना - 6 ऑक्टोबर, रांची
दुसरा एकदिवसीय सामना - 9 ऑक्टोबर, लखनौ
तिसरा एकदिवसीय सामना - 11 ऑक्टोबर, दिल्ली

 

 

Web Title: India-South Africa 1st ODI will be 45 overs due to rain 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.