क्रिकेट जगावर आता अश्विन राज! इंदूर कसोटी सुरू असताना आली सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत सध्या पाहूण्यांचे पारडे जड दिसत आहे, पण भारतीय गोलंदाज आर अश्विनने जगावर राज्य गाजवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 03:09 PM2023-03-01T15:09:12+5:302023-03-01T15:09:40+5:30

whatsapp join usJoin us
India spinner Ravichandran Ashwin has risen to the top of the latest  ICC Men’s Test Bowling Rankings as James Anderson’s stay at the summit comes to an end. | क्रिकेट जगावर आता अश्विन राज! इंदूर कसोटी सुरू असताना आली सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी

क्रिकेट जगावर आता अश्विन राज! इंदूर कसोटी सुरू असताना आली सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय ऑफस्पिनर आर अश्विन इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला मागे टाकत ICC कसोटी क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे . अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत सहा विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याच जोरावर त्याने अव्वल स्थान पटकावले. आता त्याला मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये आघाडी वाढवण्याची संधी आहे.

Ind vs Aus 3rd test live : रवींद्र जडेजाचे 'लाड', आर अश्विनवर 'अन्याय'; जगासमोर चूक येताच रोहित शर्मा...


४० वर्षीय अँडरसनने २२ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला अव्वल स्थानावरून बाहेर काढले होते.  न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सात बळी घेणारा अँडरसन १९३६ नंतरचा नंबर वन कसोटी गोलंदाज ठरणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला . मात्र, दुसऱ्या कसोटीत केवळ तीन विकेट्स घेतल्याने त्याला अव्वल स्थान कायम राखता आले नाही. 


भारताचा जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी यांनीही प्रत्येकी एक स्थानाची प्रगती करत अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडूंनी गेल्या वर्षी जुलैपासून एकही कसोटी खेळलेली नाही. खरं तर, इंग्लंडचा ऑली रॉबिन्सन दोन स्थानांनी खाली घसरला असून बुमराह आणि शाहीनला याचा फायदा झाला आहे. दिल्ली कसोटीत 10 बळी घेऊन सामनावीर ठरलेला रवींद्र जडेजा कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या तर अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे.


सहा कसोटी सामन्यांमध्ये ९८.७७ च्या स्ट्राईक रेटने ८०९ धावा करणारा हॅरी ब्रूक फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीसोबत संयुक्त १६व्या स्थानावर आहे . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: India spinner Ravichandran Ashwin has risen to the top of the latest  ICC Men’s Test Bowling Rankings as James Anderson’s stay at the summit comes to an end.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.