Join us  

रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाडसह युवा खेळाडूंना अजित आगरकर ट्वेंटी-२० संघात संधी देणार

India Squad Ireland T20Is : अजित आगरकरच्या नेतृत्वाखाली निवड समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ट्वेंटी-२० संघ जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 12:39 PM

Open in App

India Squad Ireland T20Is : अजित आगरकरच्या नेतृत्वाखाली निवड समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ट्वेंटी-२० संघ जाहीर केला. काही युवा खेळाडूंना संधी न मिळाल्याने नाराजीचा सूर लागला. पण, वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ १८, २० व २३ ऑगस्टला आयर्लंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी लवकरच संघ जाहीर केला जाईल आणि त्यात आयपीएल २०२३ गाजवणारे रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाडसह अन्य युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.  

आगरकरच्या नेतृत्वाखालील समिती आयर्लंड दौऱ्यासाठी आणखी काही खेळाडूंना विश्रांती देण्याच्या तयारीत आहेत. ''रिंकूनसह अन्य युवा खेळाडूंनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि ते आयर्लंड दौऱ्यासाठी रवाना होतील. निवड समिती सध्याच्या धडीला एकाच मालिकेत सर्वांना संधी देऊन चाचपणी करण्याच्या तयारीत नाहीत,''असे सूत्रांनी सांगितले. भारताच्या वन डे संघातील ७ खेळाडू विंडीजविरुद्धच्या ट्वेंटी-२० संघात खेळणार नाहीत. कारण, आशिया चषक आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला गेला आहे. आयर्लंड मालिकेसाठी ऋतुराज गायकवाडरिंकू सिंग जाणार आहेत. आशियाई स्पर्धआ डोळ्यासमोर ठेवून निवड समिती काही प्रयोग करू पाहत आहेत. याशिवाय निवड समितीने बीसीसीआयकडे भारत अ संघाच्या अतिरिक्त दौऱ्याची विनंती केली आहे.  

शिखर धवन आशियाई स्पर्धेसाठीच्या संघाचे नेतृत्व करण्याचा अंदाज आहे. गायकवाड, जितेश आणि रिंकूसह उम्रान मलिका, अर्शदीप सिंग, राहुल चहर आणि तिलक वर्मा यांनाही संधी मिळू शकते.  इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रिंकूने १४ सामन्यांत ४७४ धावा चोपून सर्वांना इम्प्रेस केलं होतं. एकहाती सामना फिरवण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. ऋतुराज वेस्ट इंडिज दौऱ्यावरील वन डे व कसोटी संघाचा सदस्य असलेल्या ऋतुराज गायकवाडला मात्र ट्वेंटी-२० संघातून वगळण्यात आले. आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या या सलामीवीराने १६ सामन्यांत ५९० धावा चोपल्या होत्या.  जितेशनेही ३०९ धावा केल्या आहेत.  

टॅग्स :रिंकू सिंगऋतुराज गायकवाड
Open in App