India vs England, T20 Series : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या टी-२० संघात युवा खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. यात सुर्यकुमार यादव, राहुल तेवतिया, श्रेयस अय्यर, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, इशान किशन या युवा खेळाडूंचा समावेश आहे. तर भारताचा हुकमी गोलंदाज भुवनेश्वर कुमारचंही संघात पुनरागमन झालं आहे. पण भारताचा युवा फलंदाज संजू सॅमसन याचा समावेश करण्यात आलेला नसल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (India squad for Paytm T20I series against England announced)
भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध एकूण पाच टी-२० सामने खेळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बायो-बबलच्या नियमांनुसार हे पाचही सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार आहेत. पहिला सामना १२ मार्च रोजी होणार आहे. तर २० मार्च रोजी शेवटचा टी-२० सामना खेळविला जाणार आहे. भारतीय संघ सध्या तिसऱ्या कसोटीसाठी याच स्टेडियमवर सराव करत असून २४ फेब्रुवारी रोजी या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांचा समावेश असलेल्या टी-२० मालिकेसाठीच्या संभाव्य १५ सदस्य भारतीय संघाची घोषणा आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) केली आहे.
असा आहे भारतीय संघ-विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), KL Rahul, Shikhar Dhawan, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Hardik, Rishabh Pant (wk), Ishan Kishan (wk), Y Chahal, Varun Chakravarthy, Axar Patel, W Sundar, R Tewatia, T Natarajan, Bhuvneshwar Kumar, Deepak Chahar, Navdeep, Shardul Thakur.