दाम्बुला : कसोटी मालिकेत क्लीन स्वीप दिल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ रविवारपासून श्रीलंकेविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेच्यानिमित्ताने २०१९ विश्वकप स्पर्धेसाठी संभाव्य खेळाडूंचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजय मिळवला असून वन-डे सामन्यांच्या मालिकेतही हीच लय कायम राखण्यास पाहुणा संघ उत्सुक आहे.
ही मालिका अन्य मालिकेप्रमाणे राहणार नाही, हे निश्चित. कारण निवड समितीप्रमुख एमएसके प्रसाद यांनी इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये होणाºया विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर फिटनेसवर विशेष लक्ष राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
भारतीय संघव्यवस्थापनाने याची दखल घेताना महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यात या मालिकेत राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळविण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. दुखापतीमुळे राहुलला आतापर्यंत केवळ सहा वन-डे सामने खेळता आले. त्यात त्याने सर्वच लढतींमध्ये डावाची सुरुवात केली. राहुलने २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पहिले वन-डे शतक झळकावले होते. त्या मालिकेत त्याने एक अर्धशतकी खेळीही केली होती. त्यानंतर त्याने तीन वन-डे सामने इंग्लंडविरुद्ध खेळले. त्यात सलामीला खेळताना त्याने केवळ २४ धावा केल्या होत्या. तंदुरुस्त असता तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो सहभागी झाला असता, पण युवराज संघात असल्यामुळे राहुलला सलामीलाच खेळावे लागले असते. राहुलला चौथ्या क्रमांकावर संधी मिळणार आहे. कारण सध्याचा फॉर्म बघता त्याला अंतिम ११ खेळाडूंमधून वगळता येणार नसल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)
विराटला ३ नवे विक्रम नोंदविण्याची संधी
पॉन्टिंगचा विक्रम मोडण्याची संधी : विराटने आतापर्यंत १८९ वन-डे सामने खेळले असून त्यात त्याने २८ शतके झळकावली आहेत. वन-डेमध्ये सर्वाधिक शतके नोंदवण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्यानंतर रिकी पॉन्टिंग(३०) दुसºया क्रमांकावर आहे. विराटने या मालिकेत तीन शतके ठोकली तर तो पॉन्टिंगचा विक्रम मोडित दुसºया स्थानावर येईल.
षटकारांचे शतक : विराट कोहलीने वन-डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ९१ षटकार ठोकले आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक ठोकण्यासाठी त्याला ९ षटकारांची गरज आहे. तो वन-डेमध्ये षटकारांचे शतक पूर्ण करणारा तो आठवा भारतीय फलंदाज ठरेल.
जवळजवळ ८०० चौकारांची नोंद: कोहलीने आतापर्यंत १८९ वन-डे सामन्यांत ७६६ चौकार लगावले आहेत. कोहलीला ८०० चौकारांचा पल्ला गाठण्यासाठी ३४ चौकारांची गरज आहे. कोहलीने या मालिकेत दोन-तीन मोठ्या खेळी केल्या तर त्याला ८०० चौकारांचा पल्ला गाठण्याची संधी आहे. वन-डेमध्ये सर्वाधिक २०१६ चौकार लगावण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे.
विशेष भूमिका देण्याची गरज : कोहली
दाम्बुला : विराट कोहलीने २०१९ मध्ये होणाºया विश्वकप स्पर्धेवर लक्ष केंद्रित करताना आगामी दोन वर्षांत काही खेळाडूंवर विशेष जबाबदारी सोपविण्याचे निश्चित केले आहे. प्रतिस्पर्धी संघाचा विचार करून खेळाडूंचा वापर करणार का, याबाबत बोलताना कोहली म्हणाला, ‘कुठल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळत आहोत, हे महत्त्वाचे आहे. खेळाडूवर विशेष जबाबदारी सोपविण्याची वेळ आलेली आहे. लोकेश राहुल मधल्या फळीत खेळणार असल्याचे निश्चित आहे तर केदार जाधव व मनीष पांडेदरम्यान उर्वरित स्थानासाठी चुरस राहील.’
‘मालिकेतील पराभव विसरावा लागेल’
कसोटी मालिकेत ३-० ने पत्करावा लागलेला पराभव विसरून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मिळवलेल्या विजयाने मनोधैर्य उंचवावे लागेल, अशी प्रतिक्रिया श्रीलंका वन-डे संघाचा कर्णधार उपुल थरंगाने व्यक्त केली. पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेतील पहिल्या लढतीच्या पूर्वसंध्येला बोलताना थरंगा म्हणाला,‘कसोटी मालिका व त्यात केलेल्या चुका आम्हाला विसराव्या लागतील.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, के. एल. राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, एम. एस. धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल,
कुलदीप यादव, यजुर्वेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर.
श्रीलंका : उपुल थरंगा (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुशल मेंडिस, धनुष्का गुणतिलका, चमारा कपूगेदारा, मिलिंद सिरिवर्धना, अकिला धनंजया, मलिंडा पुष्पकुमारा, लक्षण संदाकन, थिसारा परेरा, वानिंदू हसरंगा, लसिथ मलिंगा, दुष्मंता चामिरा, विश्वा फर्नांडो.
Web Title: India-Sri Lanka's first one-day match today, Virat has the opportunity to record a new record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.