सूर्यकुमार यादवला तिसऱ्या सामन्यापूर्वी मिळाली गुड न्यूज; आयसीसीने कौतुकाने पाठ थोपटली 

ICC T20 Rankings : भारत-न्यूझीलंड यांच्यातला तिसरा निर्णयक ट्वेंटी-२० सामना आज अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 03:10 PM2023-02-01T15:10:28+5:302023-02-01T15:10:43+5:30

whatsapp join usJoin us
India star Suryakumar Yadav registers career-high rating on the updated ICC Men's T20I Batting Rankings | सूर्यकुमार यादवला तिसऱ्या सामन्यापूर्वी मिळाली गुड न्यूज; आयसीसीने कौतुकाने पाठ थोपटली 

सूर्यकुमार यादवला तिसऱ्या सामन्यापूर्वी मिळाली गुड न्यूज; आयसीसीने कौतुकाने पाठ थोपटली 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 Rankings : भारत-न्यूझीलंड यांच्यातला तिसरा निर्णयक ट्वेंटी-२० सामना आज अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar yadav) याला गुड न्यूज मिळाली आहे. आयसीसीने आज जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्याने अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत करताना कारकीर्दितील सर्वाधिक रेटिंग पॉईंट्सची कमाई केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात सूर्याने ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती आणि त्याचाच फायदा त्याच्या रेटिंग पॉईंट्समध्ये झाला.

सूर्यकुमार यादव २ नोव्हेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिजवान याला मागे टाकून ट्वेंटी-२०तील नंबर १ फलंदाज बनला होता. त्यानंतर तो अव्वल स्थानावर कायम आहे आणि त्यावरील पकड अधिक मजबूत करत चालला आहे.  सूर्यकुमार यादवचे ९१० पॉईंट्स झाले आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या मोहम्मद रिजवानचे ८३६ पॉइंट्स आहेत. 

 
आजच्या तिसऱ्या सामन्यात दमदार खेळी करून त्याला रेटिंग पॉईंट्समध्ये अधिक सुधारणा करण्याची संधी आहे. इंग्लंडच्या डेव्हिड मलानने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ९१५ रेटिंग पॉईंट्स कमावले होते आणि सूर्याला हा विक्रम मोडण्याची संधी आहे. आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ६ सामन्यांत सूर्याने २३९ धावा करताना अव्वल स्थान पटकावले आणि आयसीसीने त्याला २०२२ मधील सर्वोत्तम ट्वेंटी-२० क्रिकेटपटू म्हणून गौरविले आहे.

न्यूझीलंडच्या फिन अॅलननेही ८ स्थानांची झेप घेत १९ वा, तर डॅरील मिचेलने ९ स्थानांच्या सुधारणेसह २९वा क्रमांक पटकावला आहे. किवी कर्णधार मिचेल सँटनर याने अष्टपैलू कामगिरी करून मोठी झेप घेतली. ३० वर्षीय गोलंदाज ९व्या क्रमांकावर आला आहे आणि अष्टपैलू खेळाडूंमध्ये पाच स्थानांच्या सुधारणेसह २३व्या स्थानावर आला.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: India star Suryakumar Yadav registers career-high rating on the updated ICC Men's T20I Batting Rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.