ठळक मुद्देस्थानिक मैदानावर सलग १२ कसोटी जिंकणा-या भारताला विदेशातही आम्ही ‘शेर’च आहोत, हे सिद्ध करण्याचे आव्हान असेल.२०१८-१९च्या कडव्या मोसमाची सुरुवात द. आफ्रिकेविरुद्ध तीन कसोट्यांद्वारे होत आहे.
मुंबई - भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या कसोटीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या दक्षिण आफ्रिकेला प्रारंभीच तीन धक्के बसले आहेत. सलामीवीर एल्गार, एडेन मार्कराम आणि हाशिम अमला स्वस्तात बाद होऊन तंबूत परतले आहेत. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने तिघांना तंबूचा रस्ता दाखवला. एल्गारलाही भोपळाही फोडू न देता भुवनेश्वरने यष्टीरक्षक सहाकरवी झेलबाद केले. मार्करामला (5) पायचीत पकडले. हाशिम अमलालाही (3) धावांवर भुवनेश्वरने यष्टीरक्षक सहाकरवी झेलबाद केले.
भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा सुरू झाला आहे. स्थानिक मैदानावर सलग १२ कसोटी जिंकणा-या भारताला विदेशातही आम्ही ‘शेर’च आहोत, हे सिद्ध करण्याचे आव्हान असेल.
२०१८-१९च्या कडव्या मोसमाची सुरुवात द. आफ्रिकेविरुद्ध तीन कसोट्यांद्वारे होत आहे. त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा असेल. हे सत्र कर्णधार विराट कोहली आणि सहका-यांसाठी महत्त्वाचे आहे. ‘घरचे शेर विदेशात ढेर’ हा समज चुकीचा ठरवून कामगिरी सुधारण्यासाठी झुंज द्यावी लागेल. भारताचे यश वेगवान माºयावर ब-याच अंशी विसंबून आहे. रँकिंगमध्ये भारताने द. आफ्रिकेवर वर्चस्व गाजविले आहे. संघाने ०-३ ने मालिका गमावली, तरीही हे स्थान अबाधित राहील. कोहलीच्या संघासाठी मात्र केवळ आकडे आणि रँकिंग महत्त्वाचे नाही.
यजमान द. आफ्रिका संघ भारताचा बलाढ्य फलंदाजी क्रम कोसळविण्यास सज्ज आहे. त्यासाठी वेगवान मारा तयार ठेवण्यात आला असून, भारतीय संघाने हे आव्हान परतविण्यास कंबर कसली आहे. मागील दोन दौºयांत भारताने आफ्रिकेत चांगली कामगिरी केली. २०१०मध्ये मालिका बरोबरीत सोडविली, तर २०१३-१४मध्ये कडव्या संघर्षात भारताचा पराभव झाला. त्या संघातील १३ खेळाडू सध्याच्या संघात आहेत. या सर्वांना मोठा अनुभव असून, अनेक विजयांत त्यांनी योगदान दिले आहे.
Web Title: India started out for the first time, initially South Africa had three shocks
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.