Join us  

‘बॉक्सिंग डे’कसोटी विजयाची भारताला अद्याप प्रतीक्षाच

भारत- आॅस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. तिसरी अर्थात‘ बॉक्सिंग डे’ कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबोर्नमध्ये सुरू होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 4:57 AM

Open in App

नवी दिल्ली : भारत- आॅस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. तिसरी अर्थात‘ बॉक्सिंग डे’ कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबोर्नमध्ये सुरू होत आहे. भारतीय संघ अद्याप आॅस्ट्रेलियात बॉक्सिंग डे विजय मिळवू शकला नसल्याने यंदा संधी असेल. नाताळच्या दुसऱ्या दिवशी सुरू होणाºया सामन्याला ‘बॉक्सिंग डे’ कसोटी संबोधण्यात येते.भारताने आतापर्यंत १४ बॉक्सिंग डे कसोटी खेळल्या. त्यापैकी केवळ एक सामना जिंकण्यात यश आले तेही द. आफ्रिकेत. त्याचवेळी १४ पैकी १० सामने गमावले, तर तीन सामने अनिर्णीत राहिले. आॅस्ट्रेलियात भारताने सात बॉक्सिंग डे सामने खेळले. त्यातील पाच गमावले तर दोन सामने अनिर्णीत सुटले.आॅस्ट्रेलियात बॉक्सिंग डे कसोटीचे आयोजन १९८० पासून मेलबोर्न मैदानावर होते. या दरम्यान केवळ एकदा १९८९ मध्ये याच दिवशी एकदिवसीय सामना झाला. भारत १९८५ पासून बॉक्सिंग डे कसोटीत सहभागी होत असून पहिली कसोटी अनिर्णीत राहिली होती. त्याआधी भारताने मेलबोर्नमध्ये पाच सामने खेळले. त्यातील दोन जिंकले तर तीन सामन्यात पराभव झाला. पण या ऐतिहासिक मैदानावर बॉक्सिंग डे कसोटी सुरू झाल्यापासून भारताला विजय प्राप्त करता आलेला नाही.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया