नॉर्थ साऊंड, अँटिग्वा - वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ भक्कम स्थितीत पोहोचला आहे. कर्णधार विराट कोहली आणि आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या अभेद्य शतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 185 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्याबरोबरच तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची आघाडी 260 पर्यंत पोहोचली आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडिजचा पहिला डाव 222 धावांत गुंडाळत भारताने पहिल्या डावात 75 धावांची आघाडी घेतली होती. आघाडीचे तीन फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी दमदार फलंदाजी करत संघाला सुस्थितीत आणले. या दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण करताना चौथ्या विकेटसाठी अभेद्य 104 धावांची भागीदारी केली. विराट आणि अजिंक्यने दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारताने कॅरेबियन गोलंदाजांवर वर्चस्व राखले. तिसऱ्या दिवसअखेर विराट कोहली 51 तर अजिंक्य रहाणे 53 धावांवर खेळत होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- रहाणे-कोहलीची अभेद्य शतकी भागीदारी, पहिल्या कसोटीत भारत भक्कम स्थितीत
रहाणे-कोहलीची अभेद्य शतकी भागीदारी, पहिल्या कसोटीत भारत भक्कम स्थितीत
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ भक्कम स्थितीत पोहोचला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 7:56 AM
ठळक मुद्देवेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ भक्कम स्थितीतकर्णधार विराट कोहली आणि आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांची अभेद्य शतकी भागीदारीतिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाकडे 260 आघाडी