India T20 WC Squad, Jasprit Bumrah Injury: रवींद्र जडेजानंतर आता जसप्रीत बुमराह ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली. स्ट्रेच फॅक्चर ( पाठीच्या दुखापतीमुळे) त्याने माघार घेतल्याचे वृत्त PTI ने दिले आणि एकच खळबळ उडाली. आता बुमराहच्या जागी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमी व दीपक चहर यांची नावे चर्चेत आहेत. या दोघांनाही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात राखीव खेळाडू म्हणून निवडले गेले आहे. पण, मुख्य संघात बुमराहची रिप्लेसमेंट कोण करेल याची उत्सुकता आहे. त्यात BCCI ने मास्टर प्लान तयार केला आहे.
शिखर धवनकडे नेतृत्व, Sanju Samson भारतीय संघाचा उप कर्णधार! लवकरच संघ जाहीर होणार
बीसीसीआयने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन ट्वेंटी-२० सामन्यांसाठी जसप्रीतच्या जागी मोहम्मद सिराजची निवड केली. बीसीसीआयने ट्विट करून ही माहिती देताना जसप्रीत आता मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमीला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे, परंतु २०२१च्या वर्ल्ड कपनंतर शमी ट्वेंटी-२० खेळलेला नाही. ही चिंता BCCI लाही सतावतेय आणि त्यासाठीच आता शमीला आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत खेळवण्याचा विचार BCCI करतेय. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळेच आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठीच्या संघ निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत शमीची निवड झाली होती, परंतु त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्याला माघार घ्यावी लागली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी तो तंदुरुस्त नसल्याचे BCCI ने सांगितले. पण, त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ''शमीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. NCA मध्ये त्याला दाखल व्हावे लागेल. त्याने एकही ट्वेंटी-२० सामना खेळलेला नाही, ही चिंतेची बाब आहेच. पण, त्याला मॅचसाठी सज्ज व्हावे लागेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी त्याला सराव मिळावा यासाठी आफ्रिकेविरुद्ध त्याला वन डेत खेळवायचे की नाही, हे निवड समितीवर आहे,''असे BCCI च्या अधिकाऱ्याने सांगितले.
दक्षिण आफ्रिकेचा वन डे संघ - टेम्बा बवुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रीक्स, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, येनमन मलान, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, एडिल फेहलुकवायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी.
IND vs SA ODI Schedule:पहिली वन डे - ६ ऑक्टोबर, रांचीदुसरी वन डे - ९ ऑक्टोबर, लखनौतिसरी वन डे - ११ ऑक्टोबर, दिल्ली
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"