Join us  

‘भारत-द. आफ्रिका अंतिम सामना रंगणार’; दोन्ही संघ फॉर्मात

दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर (इंग्रजी माध्यम) शाळेत एबीने गुरुवारी विशेष भेट देताना विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 5:51 AM

Open in App

रोहित नाईक

मुंबई : ‘विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळतील अशी आशा आहे. दोन्ही संघ चांगल्या लयीत असून, दक्षिण आफ्रिकेला विश्वचषक उंचावताना पाहणे आवडेल,’ असे दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स याने गुरुवारी सांगितले.

दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर (इंग्रजी माध्यम) शाळेत एबीने गुरुवारी विशेष भेट देताना विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी, अनेक विद्यार्थ्यांनी एबीवर प्रश्नांचा मारा करत त्याला विचारात पाडले. एबी म्हणाला की, ‘नक्कीच भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामनाही याच दोन संघांमध्ये होण्याची आशा आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारल्यास आनंद होईल. कारण, हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला वहिला विश्वविजय ठरेल. पण, भारताने बाजी मारली, तरीही मला आनंदच होईल. भारतासाठी मला विशेष प्रेम आहे. कारण आयपीएलमुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.’

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरोहित शर्मा