ICC ODI batters ranking -भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध ज्याप्रकारे खेळ केला, तो पाहून सारेच चक्रावले आहेत. पाकिस्तानची गोलंदाजांची फळी ही जगात सर्वात घातक असल्य़ाचा दावा केला जात होता, परंतु भारतीय फलंदाजांनी त्यांना जमिनीवर आणले. आता भारताकडून आयसीसी वन डे रँकिंगमध्ये पाकिस्तानच्या वर्चस्वाला आव्हान दिलं गेलं आहे. आयसीसीने आजच जाहीर केलेल्या वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत शुबमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मोठी झेप घेतली आहे.
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ अपराजित आहे आणि आता आयसीसी वन डे फलंदाजांमध्ये टॉप १० मध्ये तीन भारतीय आहेत. शुबमनने आशिया चषक स्पर्धेत दोन अर्धशतकं झळकावताना १५४ दावा केल्या आहेत आणि त्याचा खूप मोठा फायदा त्याला आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत झाला आहे. त्याने ७५९ रेटींग पॉइंटसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम हा ( ८६३) अव्वल स्थानावर आहे, परंतु आता त्याचे नंबर १ स्थान गिलकडून हिरावले जाण्याचा अंदाज आहे. भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत ५ वन डे सामने खेळणार आहेत आणि त्यात गिल दमदार कामगिरी करून नंबर १ बनू शकतो.
शुबमन गिलसह भारताचा कर्णधार रोहित शर्मा २ क्रमांकाच्या सुधारणेसह ९व्या, तर विराट कोहली ८व्या क्रमांकावर आहे. साडेचार वर्षानंतर प्रथमच भारताचे तीन फलंदाज टॉप १० मध्ये आले आहेत. २०१९मध्ये शिखर धवन, रोहित शर्मा व विराट कोहली हे टॉप १० मध्ये होते. पाकिस्तानचे तीन फलंदाज ताज्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये आहेत. बाबर आजमसह इमाम उल हक ( ५) आणि फखर जमान ( १०) हे अव्वल १० मध्ये आहेत, परंतु या दोन्ही फलंदाजांना एक स्थान खाली घसरावे लागले आहे. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने दोन सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या आहे आणि त्याने ५ स्थानांच्या सुधारणेसह सातव्या क्रमांकावर झेप घेतलीय. हार्दिक