- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील दुसरा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. दुसऱ्या दिवसानंतर या मालिकेचा निकाल जवळपास स्पष्ट झालेला आहे. परंतु, तरीही मला १०० टक्के हमी देणे योग्य वाटत नाही. ६०० हून अधिक धावा झाल्या आहेत. दोन दिवस संपले आणि तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे मला सध्याची स्थिती पाहाता आॅस्ट्रेलिया हा सामना जिंकणार, असा कुठलाच मार्ग दिसत नाही. दुसरीकडे, भारत इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. ७१ वर्षांनंतर आॅस्ट्रेलियात भारत कसोटी मालिका जिंकणार, हे आज जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शुक्रवारचा दिवस खूप महत्त्वाचा ठरला.३ बाद ३१३ अशी धावसंख्या भारताची होती. त्यानंतर भारताचे ४ फलंदाज बाद झाले असते तर आॅस्ट्रेलियाकडे संधी निर्माण झाली असती. मात्र, भारताने ६०० धावांचा डोंगर पार केलेला आहे. खेळपट्टी सपाट आहे. फलंदाज धावा करीत आहेत. त्यांचेही फलंदाज धावा करू शकतील. त्यामुळे भारतीय गोलंदाजी कशी होते तेही पाहावे लागेल. बºयाच जणांना वाटतेय की या खेळपट्टीवर ‘टर्न’ मिळेल. त्यामुळे भारतीय गोलंदाजीकडे लक्ष असेल.चेतेश्वर पुजारा आणि पंत यांच्यात तुलना केली जाऊ नये. कारण, एक फलंदाज आघाडीचा तर दुसरा मध्यफळीतील आहे. पुजाराकडे मोठा अनुभव आहे. तो ३१-३२ वर्षांचा आहे. पंत हा युवा खेळाडू आहे. त्याने केवळ पाच-सहा सामनेच खेळलेले आहेत. त्यामुळे या दोघांत तुलना होऊ शकत नाही. पण, वैयक्तिक कामगिरीचा विचार केला तरचेतेश्वर पुजाराने कमाल केली आहे. के. एल. राहुलच्या संघातील स्थानाबाबत चर्चा होत होती. ती कुठेतरी थांबली आहे. या सामन्यात पुजारा सलग दोन दिवस खेळला. ४ सामन्यांच्या मालिकेत त्याने एकूण ५२८ धावा केलेल्या आहेत. या सामन्यात त्याने १९३ धावा केल्या. एका मालिकेत अशी वैयक्तिक कामगिरी त्यांचीही सर्वाेत्कृष्ट असेल आणि विदेशात भारताच्या कुण्या फलंदाजानेही केलेली नसेल. काही मालिका आठवतात ज्यात सुनील गावसकर, विराट कोहली, राहुल द्रविड यांनी ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. मात्र, असे फलंदाज बोटावर मोजण्याइतपत आहेत. दुसरीकडे, पंत हा चांगला यष्टिरक्षक आहे. पंतसाठी चांगली मालिका राहिली. असा खेळला तर तो कुठल्याही क्रिकेटच्या प्रकारामध्ये खेळू शकतो.गोलंदाजीचा विचार केला तर खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. अशा स्थितीत भारतीय गोलंदाजांना ‘रिलॅक्स’ होऊन चालणार नाही. त्यांना आॅस्ट्रेलियन फलंदाजांना लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ६००हून अधिक धावा झाल्याने भारताचे पारडे जड आहे. तरीही आॅस्ट्रेलियाने पहिल्याडावात ४००हून अधिक धावाकेल्या तर सामना बरोबरीकडेवळेल. भारताकडे कमीतकमी २०० धावांची आघाडी असणे गरजेचेअसेल तेव्हाच भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर टीम इंडिया!
इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर टीम इंडिया!
भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील दुसरा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. दुसऱ्या दिवसानंतर या मालिकेचा निकाल जवळपास स्पष्ट झालेला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 2:12 AM