Join us  

India tour to Ireland : इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघ आणखी एक मालिका खेळणार; पण, रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व नसणार, जाणून घ्या कारण

India tour to Ireland : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत भारतीय संघाची सततच्या दौऱ्यामुळे चांगलीच दमछाक होताना दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 12:04 PM

Open in App

India tour to Ireland : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत भारतीय संघाची सततच्या दौऱ्यामुळे चांगलीच दमछाक होताना दिसणार आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर आयपीएल २०२२ आणि त्यानंतर भारताचा इंग्लंड दौरा आहे. IPL 2022 आणि इंग्लंड दौऱ्यातील विश्रांतीच्या कालावधीत आता BCCIने आणखी एका दौऱ्याची भर घालती आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघ दोन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आयर्लंडमध्ये जाणार आहे. या मालिकेत BCCI भारताचा दुसऱ्या फळीचा संघ पाठवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या मालिकेसाठीच्या संघाचे नेतृत्व कुणा दुसऱ्याकडेच दिसू शकते.

क्रिकेट आयर्लंडने मंगळवारी भारताच्या जूनमधील दौऱ्याची घोषणा केली. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला भारतायी संघ २६ व २८ जूनला हे दोन सामने खेळणार आहे.  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या आयर्लंडने त्यांचे जून-जुलै महिन्यातील वेळापत्रक जाहीर केले. या कालावधीत आयर्लंडचा संघ भारतासह न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध खेळणार आहे. 

भारतीय संघ या दौऱ्यावर दुसऱ्या फळीचा संघ पाठवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि यष्टिरक्षक रिषभ पंत, जसप्रीत बुमराह हे आयर्लंडविरुद्ध खेळणार नाही. १ ते ५ जुलै या कालावधीत इंग्लंडविरुद्ध स्थगित झालेला एकमेव सामना होणार आहे आणि त्यासाठी हे खेळाडू आयर्लंडविरुद्ध उपलब्ध नसतील.  मागच्या वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता आणि पाच सामन्यांच्या मालिकेत त्यांनी २-१ अशी आघाडी घेतली आहे. अखेरच्या कसोटीपूर्वी भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि ती कसोटी स्थगित करावी लागली होती.   

भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रकपाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन 

ट्वेंटी-२० मालिका पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉलदुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टनतिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज

वन डे मालिका पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हलदुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्सतिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंडआयर्लंड
Open in App