Asia Cup 2023 final - आशिया चषक स्पर्धेची सर्वाधिक ७ जेतेपदं भारतीय संघाच्या नावावर आहेत, त्यापाठोपाठ श्रीलंकेने ६ जेतेपदं पटकावली आहेत. हेच दोन तगडे संघ उद्या आशिया चषक २०२३ च्या फायनलमध्ये एकमेकांना भिडणार आहेत. कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होणार आहे आणि याही सामन्यावर पावसाचे सावट आहेच. आशिया चषकातील श्रीलंकेत झालेल्या बहुतांश सामन्यांमध्ये पावसाने खोडा घातला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातली साखळी फेरीतील लढत रद्द झाली होती, तर सुपर ४ मधील लढत राखीव दिवशी पूर्ण झाली होती. अशात उद्या फायनलमध्येही पावसाने खोडा घातला अन् सामना रद्द झाला तर कोण जिंकेल? IND vs PAK सारखा फायनलसाठी राखीव दिवसही नाही.
३ तास चर्चा! आगरकर, द्रविड, रोहितसह टीम इंडियाची तातडीची बैठक; काय असेल नेमकं कारण?
पाकिस्तानकडे स्पर्धेचे यजमानपद असले तरी BCCI ने टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेतला अन् ९ सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले. पण, येथे पावसामुळे एकतर सामने रद्द झाले किंवा मध्यरात्रीपर्यंत खेळवले गेले. अशात IND vs SL Final ही पावसात वाया जाणार आहे. सुपर ४ मध्ये श्रीलंकेने अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानला नमवून फायलनमध्ये प्रवेश केला. तर भारताने पाकिस्तान व श्रीलंकेवर विजय मिळवत फायनलमध्ये जाण्याचा पहिला मान पटकावला होता. पण, सुपर ४ च्या शेवटच्या सामन्यात भारताला बांगलादेशकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे सुपर ४ च्या पॉइंट टेबलमध्ये बदल झाला
सुपर ४ ची गुणतालिका...
बांगलादेशने या एकमेव विजयाच्या जोरावर सुपर ४ च्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कूच केली. भारत ४ गुण व १.७५३ नेट रन रेटसह अव्वल स्थानी राहिला आणि श्रीलंका ४ गुण व -०.१३४ नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर. पण, पाकिस्तानची थेट चौथ्या क्रमांकावर म्हणजेच तळाला घसरण झाली.
फायनलचा निकाल काय लागेल?
पावसामुळे फायनल रद्द झाली तरी सुपर ४ ची कामगिरी किंवा गुण ग्राह्य धरले जाणार नाही. फायनलसाठी राखीव दिवसही नसल्याने दोन्ही संघांना म्हणजेच भारत-श्रीलंका यांना संयुक्त विजेतेपद दिले जाईल.
Web Title: India topper in Super 4, who will win if Asia Cup 2023 final is called off due to rain? chech the answer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.