कोरोना व्हायरसच्या संकटात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचं भविष्य टांगणीला लागलेलं असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियानं बुधवारी भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारतानं 2018-19च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यजमानांना पराभूत करून इतिहास रचला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियान ती मालिका 2-1 अशी जिंकली होती. त्याचा वचपा काढण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 3 डिसेंबरला पहिला कसोटी सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला अॅडिलेड येथे दुसरा, 26 डिसेंबरला मेलबर्न येथे तिसरा आणि 3 जानेवारी 2021मध्ये सिडनी येथे चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या समर क्रिकेटची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्धच्या डे-नाईट कसोटीनं होणार आहे. 21 नोव्हेंबरला वाका येथे ही कसोटी खेळवण्यात येईल.
पाहा संपूर्ण वेळापत्रकट्वेंटी-20 मालिका11 ऑक्टोबर - ब्रिस्बेन14 ऑक्टोबर - कॅनबेरा17 ऑक्टोबर - अॅडलेड कसोटी मालिकावि. भारत, गॅबा, 3 ते 7 डिसेंबरवि. भारत, अॅडलेड, 11 ते 15 डिसेंबरवि. भारत, मेलबर्न, 26- 30 डिसेंबरवि. भारत, सिडनी, 3 ते 7 जानेवारी 2021
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Bad News : खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; एक महिन्याच्या कन्येचं निधन
IPL 2020 न होऊ देण्याचा पाकिस्तानचा घाट; ICCच्या बैठकीपूर्वी खेळला डाव
MS Dhoniची पत्नी भडकली; म्हणाली, लॉकडाऊनमुळे लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय
आयला सचिन... मास्टर ब्लास्टरनं शेअर केला वेस्ट इंडिजच्या दिग्गजाच्या मुलाचा फोटो अन्...
सानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण