भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेनंतर अॅडलेड येथे डे- नाईट कसोटी होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार या कसोटीनंतर अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी मायदेशात परतणार आहे. त्यामुळे या कसोटीच्या तिकिटांना प्रचंड मागणी आहे. कोरोना व्हायरसच्या काळातही हा सामना पाहण्यासाठी २७ हजार प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. पण, आता या कसोटीवर अनिश्चिततेचं सावट आले आहे. अॅडलेड येथील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ही चर्चा रंगली आहे. शिवाय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनसह काही खेळाडूंच्या क्वारंटाईन कालावधीतही वाढ झाली आहे.
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, तस्मानिया आणि नॉर्दर्न टेरिटरीत यांच्या दक्षिण ऑस्ट्रेलियासोबतच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अॅडलेडपासून येणाऱ्या पाहूण्यांना १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी वाढवण्यात आला आहे. पण, क्रिकेट ऑस्ट्रेलियानं पहिली कसोटी १७ डिसेंबरपासूनच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केलं. टीम पेन व तस्मानिया संघातील त्याचे सहकारी सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ डेव्हिड वॉर्नर, जो बर्न्स, विल पुकोव्हस्की, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू वेड, टीम पेन ( कर्णधार व यष्टिरक्षक), कॅमेरून ग्रीन, सीन अबॉट, मिचेल नेसेर, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, जेम्स पॅटिन्सन, नॅथन लियॉन, मिचे स्वेप्सन.
कसोटी मालिका १७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ - सकाळी ९.३० वाजल्यापासून २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून