आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या वन डे, ट्वेंटी-20 आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात रोहित शर्माला दुखापतीमुळे स्थान देण्यात आले नाही. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रोहित मागील चार सामन्यांत खेळलेला नाही. पण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीचे त्याची संधी हुलकेली नाही. तो अजूनही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघासोबत जाऊ शकतो. किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) विरुद्धच्या सामन्यात रोहितला हॅमस्ट्रींग दुखापत झाली होती. त्यानंतर तो चार सामने खेळलेला नाही. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघातूनही त्याला वगळण्यात आले. पण, मयांक अग्रवाल दुखापतग्रस्त असूनही त्याला तीनही संघात स्थान दिल्यानं, निवड समितीवर टीका झाली.
रोहित उर्वरित आयपीएल सामन्यांतून माघार घेईल, अशाही चर्च सुरू झाल्या. पण, रोहित अजूनही दुबईत आहे आणि त्याच्या सरावाचे व्हिडीओ मुंबई इंडियन्स सातत्यानं पोस्ट करत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही रोहितच्या अनुपस्थितीवर मत मांडले,''ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी रोहितनं त्याची तंदुरुस्ती सिद्ध केल्यास निवड समिती त्याच्या नावाचा पुनर्विचार करू शकते. इशांत शर्माही तंदुरुस्त झाल्यास कसोटी मालिकेसाठी तोही ऑस्ट्रेलियात दाखल होऊ शकतो.''
''इशांत आणि रोहित यांच्या दुखापतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. इशांत या दौऱ्यातून पूर्णपणे बाद झालेला नाही. तो कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात जाऊ शकतो. रोहितनंही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तंदुरुस्त व्हावे, ही आमची इच्छा आहे. तो तंदुरुस्त झाला, तर निवड समिती पुनर्विचार नक्की करतील. मला खात्री आहे,''असेही गांगुली म्हणाला.
कसोटी संघात लोकेश राहुलनं जवळपास वर्षभरानंतर कमबॅक केले आहे. २०१९-२०च्या मोसमात त्याला कसोटी संघातून वगळले होते. त्याच्याजागी शुबमन गिलला संधी दिली होती आणि त्यानं कसोटीतील स्थान कायम राखले आहे. दुखापतग्रस्त इशांत शर्माच्या जागी संघात मोहम्मद सिराजनं स्थान पटकावलं. २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी संघाचा तो सदस्य होता.
कसोटी संघ - विराट कोहली, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान सहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
IN - लोकेश राहुल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
Out - इशांत शर्मा ( दुखापतग्रस्त)
शिखर धवनचे वन डे संघात पुनरागमन होत आहे. पृथ्वी शॉच्या जागी त्याची एन्ट्री झाली आहे. मयांक अग्रवालला न्यूझीलंड दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले होते, परंतु त्याचेही कमबॅक होत आहे. शार्दूल ठाकूरही संघात परतला असून लोकेश राहुलकडे उप कर्णधारपद सोपवले आहे.
वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर.
In - शिखर धवन, मयांक अग्रवाल, शार्दूल ठाकूर
Out - पृथ्वी शॉ, रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार ( दुखापतग्रस्त), रोहित शर्मा ( दुखापतग्रस्त)
ट्वेंटी-20 संघात वरूण चक्रवर्थी हा एकमेव नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. रिषभ पंतनं ट्वेंटी-20 संघातील स्थान गमावले असून संजू सॅमसनला कायम ठेवले आहे.
ट्वेंटी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल ( उपकर्णधार व यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्थी.
In - शिखर धवन, मयांक अग्रवाल, हार्दिक पांड्या, दीपक चहर, वरुण चक्रवर्थी
Out - रिषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, रोहित शर्मा ( दुखापतग्रस्त), शार्दूल ठाकूर
Web Title: India Tour of Australia : BCCI chief Sourav Ganguly reacts to Rohit Sharma's absence from Indian squad for Australia tour
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.