India Tour Of Australia: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू सज्ज; BCCIनं पोस्ट केले खास फोटो

इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वानंतर टीम इंडिया आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियात रवाना झाले आहेत. जवळपास ९ महिन्यांनी टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौऱ्यासाठी रवाना होत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: November 11, 2020 09:07 PM2020-11-11T21:07:26+5:302020-11-12T07:18:20+5:30

whatsapp join usJoin us
India Tour Of Australia: Indian team all set for the Australia tour, BCCI share players photo | India Tour Of Australia: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू सज्ज; BCCIनं पोस्ट केले खास फोटो

India Tour Of Australia: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू सज्ज; BCCIनं पोस्ट केले खास फोटो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वानंतर टीम इंडिया आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियात रवाना झाले आहेत. जवळपास ९ महिन्यांनी टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौऱ्यासाठी रवाना होत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी BCCIनं तगडे संघ निवडले आहेत. आयपीएलमध्ये आपल्या यॉर्करने सर्वांना अचंबित करणाऱ्या टी नटराजनचा ट्वेंटी-20 संघात समावेश करण्यात आला. रोहित शर्माला ( Rohit Sharma) वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती दिली असली तरी कसोटी संघात त्याच्या समावेशानं टीम इंडिया मजबूत झाली आहे. कारण, कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) पहिल्या कसोटीनंतर अनुष्काच्या बाळंतपणासाठी मायदेशात परतणार आहे. 

सुधारित संघ ( Revised Team For Australia Tour )
ट्वेंटी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन

वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन

कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

वन डे मालिका ( भारतीय वेळेनुसार) ( India Tour of Australia Full Schedule 2020-21) 
२७ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून  
२९ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून 
२ डिसेंबर - मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून

ट्वेंटी-20 मालिका
४ डिसेंबर -  मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून
६ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून
८ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून         
 
६-८ डिसेंबर - भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए , वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून
११-१३ डिसेंबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून 

कसोटी मालिका 
१७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ -  सकाळी ९.३० वाजल्यापासून  
२६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून
७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून
१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून
 

Web Title: India Tour Of Australia: Indian team all set for the Australia tour, BCCI share players photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.