ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात आज बीसीसीआयनं बदल जाहीर केले. विराट कोहलीनं अनुष्काच्या बाळंतपणासाठी पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परणार असल्याचे बीसीसीआयला कळवले होते. कर्णधार विराटची ही विनंती बीसीसीआयनं मान्य केली. अॅडलेड कसोटीनंतर विराट मायदेशात परतणार आहे. अशात उर्वरित तीन कसोटी सामन्यांत उप कर्णधार अजिंक्य रहाणे नेतृत्व करेल हे निश्चित आले. पण, भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण ( Irfan Pathan) याने रोहित शर्मा ( Rohit Sharma) ने कसोटी संघाचे नेतृत्व सांभाळावे असे मत व्यक्त केलं आहे.
''विराट कोहलीचे संघात नसणे, याचा संघावर मोठा परिणाम होणार आहे, परंतु त्याच्या निर्णयाचा सर्वांना सन्मान करायला हवा. त्याचा निर्णय स्वीकारायला हवा. क्रिकेटपलीकडेही आयुष्य आहे, कुटूंब अधिक महत्त्वाचे आहे, विराटच्या निर्णयाचे कौतुक करायला हवं,''असे इरफान म्हणाला. ''विराटची उणीव भरून काढणे अवघड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यानं सर्व प्रकारच्या खेळपट्टीवर खोऱ्यानं धावा केल्या आहेत, ''असेही तो म्हणाला.
कोहलीच्या अनुपस्थितीत उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व जाणं स्वाभाविक आहे, परंतु इरफानच्या मतानुसार रोहितकडे ती जबाबदारी द्यायला हवी. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं चार जेतेपदं जिंकली, शिवाय टीम इंडियानं निदाहास ट्रॉफी व आशिया कपही उंचावला. ''मी अजिंक्य राहणेच्या विरोधात नाही, परंतु रोहितनं नेतृत्व सांभाळावे. लीडर म्हणून त्यानं स्वतःला सिद्ध केलं आहे आणि त्याच्याकडे पुरेसा अनुभव आहे. सलामीवीर म्हणूनही त्याची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. 2008मध्ये त्यानं गाजवलेली वन डे मालिका आठवते आणि तेव्हा तो नवीनच होता. पण, त्यातही त्यानं दमदार खेळ केला होता,''असेही इरफान म्हणाला.
सुधारित संघ ( Revised Indian Squad)
ट्वेंटी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन
वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन
कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
वन डे मालिका ( भारतीय वेळेनुसार) ( India Tour of Australia Full Schedule 2020-21) २७ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून २९ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून २ डिसेंबर - मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून
ट्वेंटी-20 मालिका४ डिसेंबर - मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून६ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून८ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून ६-८ डिसेंबर - भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए , वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून११-१३ डिसेंबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून
कसोटी मालिका १७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ - सकाळी ९.३० वाजल्यापासून २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून