Join us  

India Tour of Australia : रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मिळालं टीम इंडियाचं उप कर्णधारपद; लोकेश राहुल म्हणतो...

India Tour of Australia : इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वानंतर भारतीय संघातील खेळाडू UAEतूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी BCCIनं काही दिवसांपूर्वी टीम इंडियाची घोषणा केली.

By स्वदेश घाणेकर | Published: November 01, 2020 3:51 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वानंतर भारतीय संघातील खेळाडू UAEतूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी BCCIनं काही दिवसांपूर्वी टीम इंडियाची घोषणा केली. या दौऱ्यासाठी निवडलेल्या तीन संघांत रोहित शर्माचे ( Rohit Sharma) नाव नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहितला दुखापत झाली आणि तो IPL मध्येही मागील तीन सामन्यांत खेळलेला नाही. रोहितच्या अनुपस्थितीत निवड समितीनं वन डे व ट्वेंटी-20 संघाचे उपकर्णधारपद लोकेश राहुलकडे ( KL Rahul)  सोपवले आहे. निवड समितीच्या या निर्णयावर माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली. आता लोकेशनंही त्याचं मत मांडलं आहे.

या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या ट्वेंटी-20, वन डे व कसोटी संघात दुखापतीमुळे रोहित शर्मा व इशांत शर्मा यांना स्थान दिलेले नाही. सूर्यकुमार यादवला चांगल्या खेळीनंतरही संधी देण्यात आलेली नाही. मोहम्मद सिराजला कसोटी संघात संधी मिळाली, तर वरुण चक्रवर्थीला ट्वेंटी-20 संघात पदार्पणाची संधी मिळाली आहे. लोकेश राहुलचे कसोटी संघात पुनरागमन झाले असून मर्यादित षटकांच्या सामन्यांत रोहितच्या अनुपस्थितीत लोकेशकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रिषभ पंतनं मर्यादित षटकांच्या संघातील स्थान गमावले आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही? BCCIकडून महत्त्वाचे अपडेट्स

IPL 2020त लोकेशची बॅट चांगलीच तळपली आहे. त्यानं १२ सामन्यांत एका शतकासह ५९५ धावा चोपल्या आहेत आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे. त्याच्या याच कामगिरीनं निवड समितीनं कसोटी संघासाठीची त्याचा विचार केला. उप कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर लोकेश राहुल म्हणाला,''हा माझ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानास्पद क्षण आहे. मी याचा विचारही केला नव्हता, परंतु मी खूप खुश आहे. या जबाबदारीसाठी आणि आव्हानासाठी मी सज्ज आहे. संघाच्या भल्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीनं.'' Fact Check: रोहित शर्मानं ट्विटर प्रोफाईलवरून Indian Cricket Team नाव हटवलं?

''या दौऱ्यासाठी मी तयार आहे आणि पुढील २-३ आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुढील २-३महिने संघासाठी महत्त्वाचे आहेत. मी एका वेळी एकाच दिवसाचा विचार करतो,''असे तो म्हणाला. लोकेशनं ३६ कसोटी सामन्यांत ३४.५८च्या सरासरीनं २००६ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघातील हायलाईट्स- रोहित शर्मा व इशांत शर्मा यांना दुखापतीमुळे संघात निवडले नाही- सूर्यकुमार यादव याला चांगल्या खेळीनंतरही संधी नाही- मोहम्मद सिराजला कसोटी संघात संधी- वरुण चक्रवर्थीला ट्वेंटी-20 संघात पदार्पणाची संधी- लोकेश राहुलचे कसोटी संघात पुनरागमन- मर्यादित षटकांच्या सामन्यांत रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलकडे उपकर्णधारपद 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियालोकेश राहुलरोहित शर्मा