Join us  

India Tour Of Australia : कसोटी संघात झाला समावेश तरीही रोहित शर्मा दुबईहून परतणार मुंबईत

इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वानंतर टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन ट्वेंटी-20, तीन वन डे व चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: November 11, 2020 5:16 PM

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन ट्वेंटी-20, तीन वन डे व चार कसोटी सामन्यांची मालिका अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परतणार

इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वानंतर टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन ट्वेंटी-20, तीन वन डे व चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. BCCIनं सुरुवातीला जाहीर केलेल्या टीम इंडियाच्या संघात रोहित शर्माला ( Rohit Sharma) स्थान दिले नव्हते. IPLमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहितला दुखापतीमुळे चार सामन्यांना मुकावे लागले होते. त्यामुळेच बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड केली नाही. पण, रोहितनं  मैदानावर कमबॅक केलं आणि बीसीसीआयची वैद्यकीय टीमही त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून होती. अखेर बीसीसीआयनं सुधारित संघ जाहीर करताना रोहितची कसोटी संघात निवड केली. असे असले तरी रोहित टीम इंडियासह ऑस्ट्रेलियाला रवाना न होता मुंबई इंडियन्सच्या सहकाऱ्यांसह मुंबईत परतला आहे. 

आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्मानं त्याचं लक्ष कसोटी क्रिकेटवर केंद्रीत करायचे ठरवले आहे. १७ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी रोहित मुंबईत परतला आहे आणि दिवाळीनंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होणार आहे. तेथे त्याच्या तंदुरुस्तीची चाचणी केली जाईल. 

''रोहित मुंबईत परतणार असून त्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होईल. बीसीसीआयशी करारबद्ध खेळाडू येथे दुखापतीतून सावरण्यासाठी अकादमीत दाखल होतात. तो कसोटी संघाचा सदस्य आहे आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी विराट कोहली ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परतणार आहे. 

कसोटी संघकसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

कसोटी मालिका १७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ -  सकाळी ९.३० वाजल्यापासून  २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्मा