Join us  

IPL 2020नंतर टीम इंडियाचे Mission Australia; जाणून घ्या दौऱ्यासाठी निवडलेला संघ अन् संपूर्ण वेळापत्रक

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १३ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी BCCIनं तगडे संघ निवडले आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: November 11, 2020 7:23 PM

Open in App
ठळक मुद्देतीन वन डे, तीन ट्वेंटी-२० व चार कसोटी सामन्यांची मालिका२०१८-१९च्या कसोटी मालिकेची पुरनावृत्ती टीम इंडिया करू शकेल का?पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली मायदेशी परतणार, उर्वरित तीन सामन्यांना मुकणार

फेब्रुवारी २०१९नंतर कोरोना व्हायरसमुळे टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. आता जवळपास ९ महिन्यांनी टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौऱ्यासाठी रवाना होत आहे. आयपीएलमध्ये आपल्या यॉर्करने सर्वांना अचंबित करणाऱ्या टी नटराजनचा ट्वेंटी-20 संघात समावेश करण्यात आला. सुरुवातीला वरुण चक्रवर्थीला संधी मिळाली होती, परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे त्यानं माघार घेतली आणि टी नटराजनची लॉटरी लागली. रोहित शर्माला ( Rohit Sharma) वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती दिली असली तरी कसोटी संघात त्याच्या समावेशानं टीम इंडिया मजबूत झाली आहे. कारण, कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) पहिल्या कसोटीनंतर अनुष्काच्या बाळंतपणासाठी मायदेशात परतणार आहे.

वन डे संघात संजू सॅमसन याची अतिरिक्त यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. इशांत शर्मा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे आणि पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात येईल, असे बीसीसीआयनं स्पष्ट केलं. वृद्धीमान साहाच्या दोन्ही हॅमस्ट्रींगला दुखापत झाली असून त्याच्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल. कमलेश नागरकोटी यालाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाता येणार नाही. अशा सर्व अडचणींतून मार्ग काढत टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. २०१८-१९च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ७१ वर्षांत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्याची पुनरावृत्ती टीम इंडिया या दौऱ्यावर करेल का? 

सुधारित संघ ( Revised Team For Australia Tour )ट्वेंटी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन

वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन

कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

वन डे मालिका ( भारतीय वेळेनुसार) ( India Tour of Australia Full Schedule 2020-21) २७ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून  २९ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून २ डिसेंबर - मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून

ट्वेंटी-20 मालिका४ डिसेंबर -  मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून६ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून८ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून          ६-८ डिसेंबर - भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए , वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून११-१३ डिसेंबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून 

कसोटी मालिका १७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ -  सकाळी ९.३० वाजल्यापासून  २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीरोहित शर्माजसप्रित बुमराह