BCCIच्या निवड समितीनं सोमवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या ट्वेंटी-20, वन डे व कसोटी संघात दुखापतीमुळे रोहित शर्मा व इशांत शर्मा यांना स्थान दिलेले नाही. सूर्यकुमार यादवला चांगल्या खेळीनंतरही संधी देण्यात आलेली नाही. मोहम्मद सिराजला कसोटी संघात संधी मिळाली, तर वरुण चक्रवर्थीला ट्वेंटी-20 संघात पदार्पणाची संधी मिळाली आहे. लोकेश राहुलचे कसोटी संघात पुनरागमन झाले असून मर्यादित षटकांच्या सामन्यांत रोहितच्या अनुपस्थितीत लोकेशकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रिषभ पंतनं मर्यादित षटकांच्या संघातील स्थान गमावले आहे.
कसोटी संघात लोकेश राहुलनं जवळपास वर्षभरानंतर कमबॅक केले आहे. २०१९-२०च्या मोसमात त्याला कसोटी संघातून वगळले होते. त्याच्याजागी शुबमन गिलला संधी दिली होती आणि त्यानं कसोटीतील स्थान कायम राखले आहे. दुखापतग्रस्त इशांत शर्माच्या जागी संघात मोहम्मद सिराजनं स्थान पटकावलं. २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी संघाचा तो सदस्य होता.
कसोटी संघ - विराट कोहली, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान सहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
- IN - लोकेश राहुल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
- Out - इशांत शर्मा ( दुखापतग्रस्त)
शिखर धवनचे वन डे संघात पुनरागमन होत आहे. पृथ्वी शॉच्या जागी त्याची एन्ट्री झाली आहे. मयांक अग्रवालला न्यूझीलंड दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले होते, परंतु त्याचेही कमबॅक होत आहे. शार्दूल ठाकूरही संघात परतला असून लोकेश राहुलकडे उप कर्णधारपद सोपवले आहे.
वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर.
- In - शिखर धवन, मयांक अग्रवाल, शार्दूल ठाकूर
- Out - पृथ्वी शॉ, रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार ( दुखापतग्रस्त), रोहित शर्मा ( दुखापतग्रस्त)
ट्वेंटी-20 संघात वरूण चक्रवर्थी हा एकमेव नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. रिषभ पंतनं ट्वेंटी-20 संघातील स्थान गमावले असून संजू सॅमसनला कायम ठेवले आहे.
ट्वेंटी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल ( उपकर्णधार व यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्थी.
- In - शिखर धवन, मयांक अग्रवाल, हार्दिक पांड्या, दीपक चहर, वरुण चक्रवर्थी
- Out - रिषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, रोहित शर्मा ( दुखापतग्रस्त), शार्दूल ठाकूर