Join us  

IND vs ENG 1st Test : मयांक अग्रवाल OUT; रोहित शर्मासोबत सलामीला कोण उतरणार?, जाणून घ्या टीम इंडियाची Playing XI

India Playing XI for 1st Test vs ENG: शुबमन गिल याच्यानंतर सलामीवीर मयांक अग्रवाल यालाही दुखापत झाली अन् त्यानं पहिल्या कसोटीतून माघार घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 8:55 PM

Open in App

India Playing XI for 1st Test vs ENG: शुबमन गिल याच्यानंतर सलामीवीर मयांक अग्रवाल यालाही दुखापत झाली अन् त्यानं पहिल्या कसोटीतून माघार घेतली. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर नेट्समध्ये सराव करताना अग्रवालच्या हेल्मेटवर चेंडू आदळला अन् त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमनं त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर तो पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचे बीसीसीआयनं जाहीर केलं. त्यामुळे आता रोहित शर्मासोबत पहिल्या कसोटीत सलामीला कोण येणार आणि टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार?, याची उत्सुकता लागली आहे. ( After Shubman Gill, another opener Mayank Agarwal has suffered an injury setback after he was ruled out of the 1st Test with a concussion)

तीन दिवसांच्या सराव सामन्यात लोकेश राहुलनं खणखणीत शतक झळकावलं होतं अन् मयांकच्या अनुपस्थितीत रोहितसह त्याचे नाव सलामीला चर्चेत आहे. राखीव सलामीवीर अभिमन्यू इश्वरन याची बीसीसीआयनं मुख्य संघात निवड केल्यानं त्याचाही पर्याय कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडे आहे. अशात विराट चार जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमी किंवा शार्दूल ठाकूर यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची त्याबाबतचा अंतिम निर्णय होणे बाकी आहे.

पृथ्वी शॉ हा पहिल्या दोन कसोटींना मुकणार हे निश्चित आहे आणि मयांकच्या माघारीमुळे लोकेशला कसोटी सलामीवीर म्हणून संघात स्थान पक्कं करण्याची चांगली संधी आहे. दोन वर्ष तो कसोटी क्रिकेटपासून दूर आहे आणि आता मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी तो सज्ज आहे. २०१९मध्ये वेस्ट इंडिजच्या मालिकेनंतर राहुलला कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. पण, त्यानं सराव सामन्यात दमदार कागिरी करून पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे.  राहुलनं पाच कसोटींत २९.९०च्या सरासरीनं २९९ धावा केल्या आहेत. 

गोलंदाजीचा विचार केल्यास आर अश्वीन आणि रवींद्र जडेजा यांच्यापैकी एकाचे अंतिम ११मधील स्थान पक्के समजले जात आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज/शार्दूल ठाकुर, मोहम्मद शमी, इशांत शर्मा हे जलदगती गोलंदाज संघात असतील.

भारताचे संभाव्य अकरा शिलेदार ( India Playing XI vs ENG 1st Test:) रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा ( Openers: Rohit Sharma, KL Rahul, No 3: Cheteshwar Pujara, No 4: Virat Kohli, No 5: Ajinkya Rahane, No 6: Rishabh Pant, No 7: Ravichandran Ashwin, No 8: Mohammed Shami, No 9: Jasprit Bumrah, No 10: Mohammed Siraj, No 11: Ishant Sharma.) 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडमयांक अग्रवाललोकेश राहुलपृथ्वी शॉ
Open in App