India Tour of England : रिषभ पंतपाठोपाठ इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियातील सपोर्ट स्टाफमधील सदस्याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रिषभसह तीन सहाय्यक प्रशिक्षकांनाही विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. रिषभसह चार जणं डरहॅम येथे टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंसह गेलेले नाहीत. The Indian Express ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. रिषभ सध्या इंग्लंडमध्ये त्याच्या नातेवाईकाच्या घरी विलगिकरणात आहे. ( After Rishabh Pant, a team support staff of Indian team in England have tested positive for COVID19.)
India vs England : रिषभ पंतला झाला कोरोना अन् टीम इंडियाच्या सराव सामन्याबद्दल आले मोठे अपडेट्स!
रिषभला घसा दुखीचा त्रास होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आणि त्यानंतर त्याची कोरोना चाचणी झाली आणि ती पॉझिटिव्ह आली. त्याच्या संपर्कात आलेल्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनाही तीन दिवसांच्या विलगिकरणात ठेवण्यात आले होते आणि त्यांनी हा कालावधी पूर्ण केला आहे. पण, सहाय्यक प्रशिक्षकांमधील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
इंग्लंड-पाकिस्तान मालिकेपूर्वी इंग्लंडच्या ताफ्यातील तीन खेळाडूंसह सात जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर भारतीय खेळाडूंचीही कोरोना चाचणी करण्यात आली. रिषभ अन् तीन सहाय्यक प्रशिक्षकांसह एकाही खेळाडूला कोरोनाची लागण झालेली नाही. त्यामुळे तुर्तास तरी मालिकेवर संकट नाही.
भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला
इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक
४ ते ८ ऑगस्ट - ट्रेंट ब्रिज
१२ ते १६ ऑगस्ट - लॉर्ड्स
२५ ते २९ ऑगस्ट- हेडिंग्ले
२ ते ६ सप्टेंबर - ओव्हल
१० ते १४ सप्टेंबर - ओल्ड ट्रॅफर्ड
Web Title: India Tour of England : Apart from Rishabh Pant, three support staff members tested Covid positive in UK
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.