India Tour of England: भारताचा श्रीलंका दौरा समाप्त झाला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली अन् राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली राखीव खेळाडूंसह टीम इंडिया या दौऱ्यावर दाखल झाली होती. टीम इंडियानं वन डे मालिका २-१नं जिंकली, तर श्रीलंकेलनं ट्वेंटी-२० मालिकेत २-१ असा विजय मिळवला. ट्वेंटी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्याआधी कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्याच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंना विलगिकरणात जावे लागले. या आठ खेळाडूंमध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांचा समावेश होता आणि आता त्यांचे इंग्लंडला जाणे अवघड वाटत आहे.
पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव हे खेळाडू सध्या श्रीलंकेत विलगिकरणातच आहेत. या ९ खेळाडूंव्यतिरिक्त टीम इंडियाचे अन्य खेळाडू मायदेशासाठी रवाना झाले आहेत. लंडन आरोग्य विभागाच्या नियमानुसार पृथ्वी व सूर्यकुमार यांना इंग्लंडमध्ये इतक्यात प्रवेश मिळणे अवघड आहे. ( as per the local protocols by the UK health authorities, they may not be given entry in England anytime soon). ''याक्षणी आम्ही याबाबत काहीच सांगू शकत नाही. पुढील काही दिवस आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्याएवजी कोणाला पाठवायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेऊ,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं InsideSport.co ला सांगितले.
IND vs SL : कृणाल पांड्यानंतर टीम इंडियातील आणखी दोन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यांना रिप्लेसमेंट म्हणून पृथ्वी व सूर्यकुमार यादवची निवड झाली. पण, श्रीलंका दौऱ्यावर कोरोना पॉझिटिव्ह कृणालच्या संपर्कात आल्यामुळे या दोघांना विलगिकरणात जावे लागले. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी ते आणखी काही दिवस श्रीलंकेतच असणार आहेत. पुढील तीन दिवस त्यांची पुन्हा RTPCR चाचणी केली जाईल. पृथ्वी व सूर्यकुमार हे दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असणे अपेक्षित होते. 12 ऑगस्टला ही कसोटी सुरू होणार आहे, परंतु आता ते लंडनच्या नियमानुसार पात्र ठरतील की नाही, याबाबत साशंकता आहे.
काय सांगतात लंडनचे कोरोना नियम?- कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला कमीतकमी 10 दिवस विलगिकरणात राहणे गरजेचे आहे, त्यानंतरच त्यांना लंडनमध्ये प्रवेश दिला जाईल- पृथ्वी व सूर्यकुमार यांना 6 ऑगस्टपर्यंत श्रीलंकेत विलगिकरणात रहावे लागले, 7 ऑगस्टला ते लंडनसाठी रवाना झाल्यास त्यांना पहिल्या दोन कसोटीत खेळता येणआर नाही. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना बायो बबलमध्ये राहता येईल - याचा अर्थ ते 22 ऑगस्टला संघाच्या इतर सदस्यासोबत सहभाग घेतील. म्हणजेच तिसर्या कसोटीच्या तीन दिवसआधी ते खेळण्यास उपलब्ध होतील. फक्त दोन कसोटींसाठी त्यांना पाठवण्यात काहीच अर्थ नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआय त्यांना पर्यायी खेळाडूंना पाठवण्याचा विचार करत आहे.