Join us  

India Tour of England : इंग्लंडचा कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर, बेन स्टोक्ससह चार तगड्या खेळाडूंचे पुनरागमन

India Tour of England : टीम इंडियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे आणि यजमान इंग्लंडनं मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठीचा 17 सदस्यीय संघ बुधवारी जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 5:45 PM

Open in App

India Tour of England : टीम इंडियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे आणि यजमान इंग्लंडनं मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठीचा 17 सदस्यीय संघ बुधवारी जाहीर केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं घरच्या मैदानावर इंग्लंडवर 3-1 असा दणदणीत विजय मिळवला होता. या कसोटी मालिकेतील विजयानंतर भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि जो रूट ( Joe Root)च्या नेतृत्वाखाली त्यांना मागील मालिकेतील पराभवाची सव्याज परतफेड करण्याची संधी आहे.

इंग्लंडनं पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली. बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो आणि सॅम कुरन  यांचे संघात पुनरागमन झाले आहे, तर ऑली रॉबिन्सन यालाही पुन्हा बोलवण्यात आले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात रॉबिन्सननं सात विकेट्स घेतल्या होत्या, परंतु त्याच्या जुन्या ट्विटमुळे आयसीसीनं त्याच्यावर बंदीची कारवाई केली होती. तपासाअंती त्याची शिक्षा कमी झाली अन् तो भारताविरुद्ध खेळणार आहे. (  Ben Stokes, Jos Buttler, Jonny Bairstow, Sam Curran return, Ollie Robinson recalled). जोफ्रा आर्चर व ख्रिस वोक्स हे अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेले नाहीत आणि त्यामुळे पहिल्या दोन कसोटींसाठी त्यांच्या नावाचा विचार केला गेला नाही. ( Jofra Archer and Chris Woakes are still not fit, so they are unavailable for the first 2 Test against India) 

इंग्लंडचा संघ ( England Men’s Test Squad) - जो रूट ( कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॅवली, सॅम कुरन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लिच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, मार्क वूड ( Joe Root Captain, James Anderson, Jonny Bairstow, Dom Bess, Stuart Broad, Rory Burns, Jos Buttler, Zak Crawley, Sam Curran, Haseeb Hameed, Dan Lawrence, Jack Leach, Ollie Pope, Ollie Robinson, Dom Sibley, Ben Stokes, Mark Wood ) 

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वालाइंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक

४ ते ८ ऑगस्ट - ट्रेंट ब्रिज१२ ते १६ ऑगस्ट - लॉर्ड्स२५ ते २९ ऑगस्ट- हेडिंग्ले२ ते ६ सप्टेंबर - ओव्हल१० ते १४ सप्टेंबर - ओल्ड ट्रॅफर्ड  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूटबेन स्टोक्सजोफ्रा आर्चरजोस बटलर