India Tour of England : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्यासोबत थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंदा यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे भारताचा आणखी एक यष्टिरक्षक वृद्धीमान सहा याच्यासह भरत अरुण व राखीव सलामीवीर अभिमन्यू इस्वरन यांना विलगिकरणात जावे लागले होते. आता रिषभची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे आणि तो २२ जुलैला भारतीय संघासोबत सरावाला सुरुवात करेल.
७२ वर्षांच्या क्रिकेटपटूची हवा; नाबाद शतकी खेळी करताना गोलंदाजांच्या आणले नाकीनऊ!
रिषभ पंत आता टीम इंडियासह सरावाला सुरुवात करेल. पण, तो पहिल्या सराव सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे आणि तो दुसऱ्या सराव सामन्यात खेळेल. ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होईल आणि त्यात तो खेळण्याची शक्यता बळावली आहे. अभिमन्यू, वृद्धीमान आणि भरत अरुण यांचा क्वारंटाईन कालावधी २४ जुलैला संपणार आहे आणि या तिघांचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. २८ जुलैला दुसरा सराव सामना सुरू होणार आहे.
भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला
इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक
४ ते ८ ऑगस्ट - ट्रेंट ब्रिज१२ ते १६ ऑगस्ट - लॉर्ड्स२५ ते २९ ऑगस्ट- हेडिंग्ले२ ते ६ सप्टेंबर - ओव्हल१० ते १४ सप्टेंबर - ओल्ड ट्रॅफर्ड