India Tour of England : भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाला तीन मोठे धक्के बसले; शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यांना बदली खेळाडू म्हणून पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांची बीसीसीआयनं निवड केली. पण, श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातील सदस्य असलेल्या पृथ्वी व सूर्यकुमार हे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या कृणाल पांड्याच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांचा इंग्लंड दौरा लांबला. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंचा कोरोन रिपोर्ट तीन वेळा निगेटिव्ह येण्याची गरज आहे. आता त्यांचा कोरोना रिपोर्ट समोर आला आहे आणि पुढील २४ तासांत ही दोघं इंग्लंडला रवाना होतील.
काश्मीर प्रीमिअर लीगला BCCIनं विरोध केला म्हणून शाहिद आफ्रिदी बरळला, केलं वादग्रस्त विधान...
''दोघांनाही त्यांचा विसा मिळालेला नाही. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे त्यांना श्रीलंकेतील इंग्लंड दुतावास कार्यालयातून विसा मिळू शकला नाही. येत्या २४ तासांत त्यांना तो मिळेल आणि ते इंग्लंडसाठी रवाना होतील,''असे सूत्रांनी सांगितले.
भारतीय संघ - रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली ( कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मह सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल, वृद्धीमान सहा, अभिमन्यू इस्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव. राखीव खेळाडू - प्रसिद्ध कृष्णा, अर्झान नागवासवाला ( Standby players: Prasidh Krishna, Arzan Nagwaswalla)
इंग्लंडचा संघ ( पहिल्या दोन कसोटींसाठी ) - जो रूट ( कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॅवली, सॅम कुरन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लिच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, मार्क वूड
इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक ( सामने दुपारी ३.३० वाजल्यापासून सुरू) ४ ते ८ ऑगस्ट - ट्रेंट ब्रिज१२ ते १६ ऑगस्ट - लॉर्ड्स२५ ते २९ ऑगस्ट- हेडिंग्ले२ ते ६ सप्टेंबर - ओव्हल१० ते १४ सप्टेंबर - ओल्ड ट्रॅफर्ड