India tour of England: भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया कसून सराव करत आहे. सोमवारी विराट अँड कंपनीच्या 'अजब' सरावाचा 'गजब' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ ट्रेंट ब्रिजमध्ये दाखल झाला आहे. यावेळी खेळाडूंकडून कॅच पकडण्याची प्रक्टीस करून घेतली गेली.
तीन दिवसांच्या सराव सामन्यात लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी आणि उमेश यादव वगळता अन्य खेळाडूंना फार ग्रेट कामगिरी करता आली नाही. त्यात वॉशिंग्टन सुंदर व आवेश खान यांना दुखापत झाली आणि त्यांनीही मालिकेतून माघार घेतली. त्यात त्यांना बदली खेळाडू म्हणून निवड झालेल्या पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांनाही विलगिकरणात जावे लागले होते. आता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून येत्या २४ तासांत ते इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.
१३ वर्षांचा इतिहास बदलण्याची संधी२००७ नंतर टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटी मालिकांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. २००७मध्ये भारतानं इथे कसोटी मालिका जिंकली होती आणि त्याची पुनरावृत्ती करण्याची विराट अँड कंपनीला संधी आहे. पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया नॉटिंग्हॅमला पोहोचली आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली ( कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मह सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल, वृद्धीमान सहा, अभिमन्यू इस्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव. राखीव खेळाडू - प्रसिद्ध कृष्णा, अर्झान नागवासवाला