टीम इंडियाचा 2020 मधला पहिला दौरा ठरला, ब्रेक न घेता थेट विमानात बसणार!

खेळाडूंची दमछाक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 07:55 PM2019-06-07T19:55:02+5:302019-06-07T19:55:59+5:30

whatsapp join usJoin us
India to tour New Zealand early next year, India will play two back to back series in only 4 day's gap | टीम इंडियाचा 2020 मधला पहिला दौरा ठरला, ब्रेक न घेता थेट विमानात बसणार!

टीम इंडियाचा 2020 मधला पहिला दौरा ठरला, ब्रेक न घेता थेट विमानात बसणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेलिंग्टन : भारतीय संघ 2020मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. पुढील वर्षी भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. 24 जानेवारीला ट्वेंटी-20 मालिकेतून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. दोन कसोटी सामने अनुक्रमे विलिंग्डन ( 21 ते 25 फेब्रुवारी) आणि ख्राईस्टचर्च ( 29 फेब्रुवारी ते 4 मार्च) येथे होतील. पण, न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला केवळ चार दिवसांची विश्रांती मिळणार आहे. दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि ती 19 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे खेळाडूंची दमछाक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



वर्ल्ड कप स्पर्धेनंतर एका महिन्याची विश्रांती घेत भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2019-20च्या हंगामातील घरच्या मैदानावरील मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार भारतीय संघ घरच्या मैदानावर 5 कसोटी, 9 वन डे आणि 12 ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. आगामी 2020 ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयनं झटपट क्रिकेट सामन्यांना प्राधान्य दिले आहे. या हंगामाची सुरुवात फ्रिडम चषक गांधी-मंडेला मालिकेनं होणार आहे. 15 सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन ट्वेंटी-20 व तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध तीन ट्वेंटी-20 व 2 कसोटी सामने खेळेल. 


वेस्ट इंडिजचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी डिसेंबरला भारतात येणार आहे. त्यानंतर मेन इन ब्लू झिम्बाब्वेविरुद्ध तीन ट्वेंटी-20 सामने खेळतील. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. दक्षिण आफ्रिका पुन्हा भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेच्या मालिकेतील कालावधीत भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ 19 जानेवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा वन डे सामना खेळणार आहे आणि खेळाडू आपापल्या घरी न जाता लगेचच न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. 
 

भारत दौऱ्यावरील वेळापत्रक 2019-2020
फ्रिडम चषक -2019 (वि. दक्षिण आफ्रिका)
15 सप्टेंबर - पहिली ट्वेंटी-20, धर्मशाला
18 सप्टेंबर - दुसरी ट्वेंटी-20, मोहाली
22 सप्टेंबर - तिसरी ट्वेंटी-20, बंगळुरू 
2 ते 6 ऑक्टोबर - पहिली कसोटी, विशाखापट्टणम
10 ते 14 ऑक्टोबर - दुसरी कसोटी, रांची
19 ते 23 ऑक्टोबर - तिसरी कसोटी, पुणे

बांगलादेशचा भारत दौरा
3 नोव्हेंबर - पहिली ट्वेंटी-20, दिल्ली
7 नोव्हेंबर - दुसरी ट्वेंटी-20, राजकोट
10 नोव्हेंबर - तिसरी ट्वेंटी-20, नागपूर
14 ते 18 नोव्हेंबर- पहिली कसोटी, इंदूर
22 ते 26 नोव्हेबर - दुसरी कसोटी, कोलकाता

वेस्ट इंडिजचा भारत दौरा
6 डिसेंबर - पहिली ट्वेंटी-20, मुंबई
8 डिसेंबर - दुसरी ट्वेंटी-20, तिरुवनंतपुरम 
11 डिसेंबर - तिसरी ट्वेंटी-20, हैदराबाद
15 डिसेंबर - पहिली वन डे, चेन्नई
18 डिसेंबर - दुसरी वन डे, विशाखापट्टणम
22 डिसेंबर - तिसरी वन डे, कटक 


झिम्बाब्वेचा भारत दौरा - 2020
5 जानेवारी - पहिली ट्वेंटी-20, गुवाहाटी
7 जानेवारी - दुसरी ट्वेंटी-20, इंदूर
10 जानेवारी - तिसरी ट्वेंटी-20, पुणे

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा - 2020
14 जानेवारी - पहिली वन डे, मुंबई
17 जानेवारी - दुसरी वन डे, राजकोट
19 जानेवारी - तिसरी वन डे, बंगळुरू 

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा - 2020
12 मार्च - पहिली वन डे, धर्मशाला
15 मार्च - दुसरी वन डे, लखनऊ
18 मार्च - तिसरी वन डे, कोलकाता 

भारताचा न्यूझीलंड दौरा 2020
24 जानेवारी - पहिला ट्वेंटी-20, ऑकलंड
26 जानेवारी - दुसरा ट्वेंटी-20, ऑकलंड
29 जानेवारी - तिसरा ट्वेंटी-20, हॅमिल्टन
31 जानेवारी - चौथा ट्वेंटी-20, वेलिंग्टन
2 फेब्रुवारी - पाचवा ट्वेंटी-20, टौरांगा
5 फेब्रुवारी - पहिला वन डे, हॅमिल्टन
8 फेब्रुवारी - दुसरा वन डे, ऑकलंड
11 फेब्रुवारी - तिसरा व डे, टौरांगा

Web Title: India to tour New Zealand early next year, India will play two back to back series in only 4 day's gap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.