वेलिंग्टन : भारतीय संघ 2020मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. पुढील वर्षी भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. 24 जानेवारीला ट्वेंटी-20 मालिकेतून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. दोन कसोटी सामने अनुक्रमे विलिंग्डन ( 21 ते 25 फेब्रुवारी) आणि ख्राईस्टचर्च ( 29 फेब्रुवारी ते 4 मार्च) येथे होतील. पण, न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला केवळ चार दिवसांची विश्रांती मिळणार आहे. दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि ती 19 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे खेळाडूंची दमछाक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारत दौऱ्यावरील वेळापत्रक 2019-2020फ्रिडम चषक -2019 (वि. दक्षिण आफ्रिका)15 सप्टेंबर - पहिली ट्वेंटी-20, धर्मशाला18 सप्टेंबर - दुसरी ट्वेंटी-20, मोहाली22 सप्टेंबर - तिसरी ट्वेंटी-20, बंगळुरू 2 ते 6 ऑक्टोबर - पहिली कसोटी, विशाखापट्टणम10 ते 14 ऑक्टोबर - दुसरी कसोटी, रांची19 ते 23 ऑक्टोबर - तिसरी कसोटी, पुणे
बांगलादेशचा भारत दौरा3 नोव्हेंबर - पहिली ट्वेंटी-20, दिल्ली7 नोव्हेंबर - दुसरी ट्वेंटी-20, राजकोट10 नोव्हेंबर - तिसरी ट्वेंटी-20, नागपूर14 ते 18 नोव्हेंबर- पहिली कसोटी, इंदूर22 ते 26 नोव्हेबर - दुसरी कसोटी, कोलकाता
वेस्ट इंडिजचा भारत दौरा6 डिसेंबर - पहिली ट्वेंटी-20, मुंबई8 डिसेंबर - दुसरी ट्वेंटी-20, तिरुवनंतपुरम 11 डिसेंबर - तिसरी ट्वेंटी-20, हैदराबाद15 डिसेंबर - पहिली वन डे, चेन्नई18 डिसेंबर - दुसरी वन डे, विशाखापट्टणम22 डिसेंबर - तिसरी वन डे, कटक
झिम्बाब्वेचा भारत दौरा - 20205 जानेवारी - पहिली ट्वेंटी-20, गुवाहाटी7 जानेवारी - दुसरी ट्वेंटी-20, इंदूर10 जानेवारी - तिसरी ट्वेंटी-20, पुणे
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा - 202014 जानेवारी - पहिली वन डे, मुंबई17 जानेवारी - दुसरी वन डे, राजकोट19 जानेवारी - तिसरी वन डे, बंगळुरू
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा - 202012 मार्च - पहिली वन डे, धर्मशाला15 मार्च - दुसरी वन डे, लखनऊ18 मार्च - तिसरी वन डे, कोलकाता
भारताचा न्यूझीलंड दौरा 202024 जानेवारी - पहिला ट्वेंटी-20, ऑकलंड26 जानेवारी - दुसरा ट्वेंटी-20, ऑकलंड29 जानेवारी - तिसरा ट्वेंटी-20, हॅमिल्टन31 जानेवारी - चौथा ट्वेंटी-20, वेलिंग्टन2 फेब्रुवारी - पाचवा ट्वेंटी-20, टौरांगा5 फेब्रुवारी - पहिला वन डे, हॅमिल्टन8 फेब्रुवारी - दुसरा वन डे, ऑकलंड11 फेब्रुवारी - तिसरा व डे, टौरांगा