Join us  

India tour of Bangladesh: भारतीय संघ आता बांगलादेश दौऱ्यावर जाणार; विराट, रोहित संघात परतणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

India tour of Bangladesh टीम इंडियाने कालच न्यूझीलंड दौरा आटोपला... आता तीन दिवसांत भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर खेळणार आहे आणि आज भारतीय खेळाडू रवाना होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 10:55 AM

Open in App

India tour of Bangladesh - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संपल्यानंतर आता द्विदेशीय मालिकांचे सत्र सुरू झाले आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात आता मालिका सुरूच आहे. इंग्लंडचा संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी खेळतेय... तर टीम इंडियाने कालच न्यूझीलंड दौरा आटोपला... आता तीन दिवसांत भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर खेळणार आहे आणि आज भारतीय खेळाडू रवाना होतील. न्यूझीलंडवरून काही खेळाडू थेट ढाका येथे पोहोचतील. भारत-बांगलादेश यांच्यात तीन वन डे सामन्यांची मालिका आणि दोन कसोटी सामने होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी भारताला या दोन्ही कसोटी जिंकणे महत्त्वाचे आहे.

रोहित, विराटची ट्वेंटी-२० संघातून सुट्टी! हार्दिक पांड्याकडे नेतृत्व अन् KL Rahul मारणार दांडी

भारतीय संघाला एकही पराभव WTC मध्ये महागात पडणारा ठरू शकतो. त्यामुळे वन डे मालिकेपेक्षा बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेची चर्चा आहे. वन डे मालिकेत भारतीय संघ रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय खेळणार आहेत. रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल यांनी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विश्रांती घेतली होती आणि त्यांचे पुनरागमन होणार आहे. शिखर धवन वन डे मालिकेत खेळणार आहे, तर श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व रिषभ पंत यांची कसोटी संघातही निवड केली गेली आहे.

वन डे मालिकेचे वेळात्रक

  • पहिली वन डे - ४ डिसेंबर - ढाका
  • दुसरी वन डे - ७ डिसेंबर- ढाका
  • तिसरी वन डे - १० डिसेंबर - चत्ताग्राम

कसोटी मालिका

  • पहिली कसोटी - १४ ते १८ डिसेंबर, चत्तोग्राम
  • दुसरी कसोटी - २२ ते  २६ डिसेंबर, ढाका

 

  • भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत, इशान किशन, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन  
  • बांगलादेशचा वन डे संघ - तमिम इक्बाल, लिटन दास, अनमुल हक, शाकिब अल हसन, मुशफीकर रहीम, आफिफ होसैन, यासीर अली, मेहिदी हसन, मुस्ताफिजूर रहमान, तस्किन अहमद, हसन मदमुद, इबादत होसैन, नसूम अहमद, महमुदुल्लाह, नजमूल होसैन शांतो, नुरूल हसन सोहान

 

  • भारताचा कसोटी संघ -  रोहित शर्मा, लोकेश राहुल, आर अश्विन, केएस भरत, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, रिषभ पंत, अक्षर पटेल, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, उमेश यादव
  • बांगलादेशचा कसोटी संघ अद्याप जाहीर नाही
  • वन डे मालिकेचे सामने सकाळी ११.३० वाजल्यापासून सुरू होतील, तर कसोटीचे सामने सकाळी ९ पाहून खेळवण्यात येतील. सोन स्पोर्ट्स वर ही मालिका पाहता येणार आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्माविराट कोहली
Open in App