Join us  

India Tour of England : भारताचा जलदगती गोलंदाज ट्वेंटी-२० मालिकेला मुकणार, दुखापतीमुळे आणखी महिनाभर दूर राहणार

भारतीय संघ या दौऱ्यावर तीन ट्वेंटी-२० व तितक्याच वन डे सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी BCCI पुढील आठवड्यात संघ जाहीर करण्याच्या तयारीत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 6:08 PM

Open in App

India Tour of England : भारताचा कसोटी संघ इंग्लंडविरुद्धच्या एकमेव सामन्यासाठी लंडनमध्ये दाखल झाला आहे आणि २४ जूनपासून सुरू होणाऱ्या सराव सामन्यात लेईसेस्टर येथे सरावालाही लागला आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर तीन ट्वेंटी-२० व तितक्याच वन डे सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी BCCI पुढील आठवड्यात संघ जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. पण, त्याआधीच ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट जलदगती गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) याच्या तंदुरूस्तीबाबत महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. हॅमस्ट्रींगमुळे चहरला आयपीएल २०२२ला मुकावे लागले होते. 

दुखापतीतून सावरण्यासाठी तो बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेला होता. वर्षाच्या सुरूवातीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत चहरला ही दुखापत झाली होती. पण, तो अजूनही तंदुरुस्त झालेला नाही आणि त्यासाठी त्याला किमान ५ आठवडे लागतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी त्याची निवड होणे अशक्यच आहे. पण, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी तंदुरुस्ती सिद्ध करण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे.  

''NCA ने दिलेल्या रिहॅब कार्यक्रमानुसार मी एकावेळी ४-५ षटकं गोलंदाजी करतोय... मी दुखापतीतून सावरतोय आणि पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी मला आणखी ४-५ आठवडे लागतील,''असे मत चहरने PTI शी बोलताना व्यक्त केले. २९ वर्षीय चहर आता NCA मध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यातून तो पुनरागमन करण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर याच्या हाताची दुखापत बरी झाली असून तो  लेईसेस्टर क्लबकडून कौंटी खेळणार असल्याचे समजतेय. 

दीपक चहरचा भन्नाट नाच

 दीपक चहरने रविवारी त्यांच्या लग्नातील एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला, हा व्हिडिओ काही वेळातच जबरदस्त व्हायरल झाला आहे. दीपकने 1 जून रोजी आग्रा येथे जया भारद्वाज हिच्याशी लग्न केले. दीपक चहरने आग्रा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जया भारद्वाजसोबत लग्न केले. दीपकच्या लग्नात अगदी जवळचे काही मित्र आणि नातेवाईक सहभागी झाले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने दिल्लीत लग्नाचे रिसेप्शन दिले होते. यावेळी भारतीय क्रिकेट संघ आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सहकाऱ्यांनी हजेरी लावली होती.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडदीपक चहर
Open in App