India Tour of England : भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल, पण प्रमुख खेळाडू मायदेशातच; सलामीच्या फलंदाजामुळे वाढली चिंता

India Tour of England : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इतिहास घडवण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. बुधवारी भारतीय संघ इंग्लंडच्या दिशेने रवाना झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 11:32 AM2022-06-16T11:32:11+5:302022-06-16T15:40:25+5:30

whatsapp join usJoin us
India Tour of England : India team reached London, WARM-UP match on JUNE 24TH; KL Rahul set to miss test against England | India Tour of England : भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल, पण प्रमुख खेळाडू मायदेशातच; सलामीच्या फलंदाजामुळे वाढली चिंता

India Tour of England : भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल, पण प्रमुख खेळाडू मायदेशातच; सलामीच्या फलंदाजामुळे वाढली चिंता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Tour of England : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इतिहास घडवण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. बुधवारी भारतीय संघ इंग्लंडच्या दिशेने रवाना झाला होता.  विराट कोहली व जसप्रीत बुमराह हे सीनियर खेळाडू विश्रांतीनंतर पुन्हा एकदा ब्लू जर्सीत दिसले... पण, या मालिकेसाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकेश राहुल ( KL Rahul) या प्रमुख खेळाडूने अजूनही बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी सोडलेली नाही. दुखापतीमुळे लोकेशला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून माघारी घ्यावी लागली होती. तो अजूनही त्यातून सावरलेला नाही आणि त्याच्या तंदुरुस्तीची शनिवारी चाचणी होईल. त्यानंतर त्याच्या समावेशाबाबतचा निर्णय घेतला जाईल.

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या फोटोत  विराट, जसप्रीत यांच्यासह आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व प्रसिद्ध कृष्णा दिसत आहेत. शिवाय चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी व यष्टीरक्षक केएस भरतही आहे.  मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, रिषभ पंत हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका संपल्यानंतर रविवारी इंग्लंडमध्ये दाखल होतील. १ ते ५ जुलै या कालावधीत एडबस्टन येथे कसोटी खेळवली जाणार आहे. मागील वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता आणि त्यावेळी कोरोनाचा  शिरकाव झाला होता. त्यामुळे पाचवी कसोटी स्थगित करावी लागली होती आणि ती आता खेळवली जात आहे. भारताने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.  तत्पूर्वी भारतीय संघ चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. 

भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक

  • चार दिवसीय सराव सामना वि. लेइसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब - २४ ते २७ जून  
  • भारत अ वि. डर्बिशायर ट्वेंटी-२० - १ जुलै  
  • पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन

 
इंग्लंडविरुद्धच्या  सामन्यासाठी भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, के एस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा


ट्वेंटी-२० मालिका 

पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉल
दुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टन
तिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज
 

वन डे मालिका 

पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हल
दुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्स
तिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड 

Web Title: India Tour of England : India team reached London, WARM-UP match on JUNE 24TH; KL Rahul set to miss test against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.