India Tour of England : हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. २६ व २८ जूनला या दोन लढती झाल्यानंतर भारतीय संघ लंडनमध्ये दाखल होईल. इंडियन प्रीमिअर लीग २०२२ नंतर रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह हे विश्रांतीवर होते आणि आता ते थेट इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत. यंदाचं वर्ष ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचं असल्याने या सीनियर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळताना पाहण्यासाठी सारे उत्सुक आहेत. ही इच्छा इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. पण, रोहित, विराट, जसप्रीत आदी सीनियर खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे.
वर्षभरात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय!; कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी राहुल द्रविडचं सुचक विधान
TOI ने दिलेल्या वृत्तानुसार आयर्लंडविरुद्ध निवडलेला संघच इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार आहे. ''१ ते ५ जुलै या कालावधीत पाचवी कसोटी बर्मिंगहॅम येथे होणर आहे. त्यानंतर दोन दिवसांत ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. ७ जुलैपासून साऊदहॅम्पटन येथे सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत कसोटी संघातील खेळाडूंना लगेच खेळवणे अवघड आहे आणि तेही इतक्या कमी कालावधीत. अशा परिस्थितीत आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० संघच इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत खेळले,''असे सुत्रांच्या हवाल्याने TOI ने वृत्त दिले आहे.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पुढील आठवड्यात बीसीसीआय संघ जाहीर करण्याची शक्यता आहे.
आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ - हार्दिक पांड्या ( कर्णधार), भुवनेश्वर कुमार( उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सुर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उम्रान मलिक.
भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक
- चार दिवसीय सराव सामना वि. लेइसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब - २४ ते २७ जून
- भारत अ वि. डर्बिशायर ट्वेंटी-२० - १ जुलै
- पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, के एस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा
ट्वेंटी-२० मालिका
- पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉल
- दुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टन
- तिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज
वन डे मालिका
- पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हल
- दुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्स
- तिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड