India Tour of England : रोहित शर्माची नेटमध्ये फटकेबाजी...! 24 तारखेपासून रंगणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सरावाला लागला, Video 

India Tour of England : रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह हे सीनियर खेळाडू विश्रांतीनंतर पुन्हा ब्लू जर्सीत दमदार कामगिरी करण्यासाठी परतले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 06:08 PM2022-06-20T18:08:18+5:302022-06-20T18:12:30+5:30

whatsapp join usJoin us
India Tour of England : Rohit Sharma & Shubman Gill net practice ahead of WARM-UP against Leicestershire, Watch Video | India Tour of England : रोहित शर्माची नेटमध्ये फटकेबाजी...! 24 तारखेपासून रंगणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सरावाला लागला, Video 

India Tour of England : रोहित शर्माची नेटमध्ये फटकेबाजी...! 24 तारखेपासून रंगणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सरावाला लागला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Tour of England : रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह हे सीनियर खेळाडू विश्रांतीनंतर पुन्हा ब्लू जर्सीत दमदार कामगिरी करण्यासाठी परतले आहेत. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर दाखल झाला आहे. रोहित वगळता इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठीच्या संघातील बरेचसे खेळाडू आधीच लंडनमध्ये पोहोचले होते आणि त्यांनी सरावालाही सुरुवात केली होती. दोन दिवसानंतर रोहितही दाखल झाला असून त्याने मोर्चा सांभाळला आहे. 1 ते 5 जुलै या कालावधीत भारत-इंग्लंड कसोटी सामना होणार आहे. तत्पूर्वी, टीम इंडिया 24 ते 27 जून या कालावधीत चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे आणि त्यासाठी संघ लेईसेस्टरशायर येथे दाखल झाला आहे.  

लोकेश राहुलने मालिकेतून माघार घेतल्यामुळे रोहित शर्मासोबत शुबमन गिल हा ओपनिंगला जाणार हे पक्के झाले आहे. संघ व्यवस्थापनाने लोकेशची रिप्लेसमेंट म्हणून मयांक अग्रावलाच्या नावाला काट मारली आहे. संघात एक ओपनर असताना मयांकची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही बीसीसीआयने मयांकला स्टँडबाय राहण्यास सांगितले आहे. 16 जूनला विराट कोहली, जसप्रीत, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा व शार्दूल ठाकूर हे लंडनमध्ये दाखल झाले होते. दोन दिवसांनी रोहितही तेथे रवाना झाला.  


दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपवून  रिषभ पंत, श्रेयस अय्यर व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हेही आज लंडनमध्ये पोहोचले आहेत. बीसीसीआयने भारताच्या अन्य खेळाडूंच्या सरावाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. बीसीसीआय़ने कमलेश नागरकोट्टी याचा नेट बॉलर म्हणून समावेश केला आहे. भारतीय संघ या मालिकेत 2-1 असा आघाडीवर आहे. मागच्या वर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ही आघाडी घेतली आहे आणि यंदा रोहितच्या नेतृत्वाखाली मालिका विजयासाठी संघ एडबस्टनवर उतरणार आहे.  

भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक

 

  • चार दिवसीय सराव सामना वि. लेइसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब - २४ ते २७ जून  
  • भारत अ वि. डर्बिशायर ट्वेंटी-२० - १ जुलै  
  • पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन
     
  • इंग्लंडविरुद्धच्या  सामन्यासाठी भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, के एस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा
     

Web Title: India Tour of England : Rohit Sharma & Shubman Gill net practice ahead of WARM-UP against Leicestershire, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.