भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला, पण त्यात Rohit Sharma नाही दिसला; हिटमॅन कसोटीला मुकणार?

India Tour of England : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय खेळाडू लंडनमध्ये पोहोचले आहेत. बीसीसीआयने खेळाडूंचे फोटो पोस्ट करून ही माहिती दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 04:52 PM2022-06-16T16:52:20+5:302022-06-16T16:53:35+5:30

whatsapp join usJoin us
India Tour of England : Rohit Sharma will be leaving for England on early 17th June morning | भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला, पण त्यात Rohit Sharma नाही दिसला; हिटमॅन कसोटीला मुकणार?

भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला, पण त्यात Rohit Sharma नाही दिसला; हिटमॅन कसोटीला मुकणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Tour of England : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय खेळाडू लंडनमध्ये पोहोचले आहेत. बीसीसीआयने खेळाडूंचे फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. पण, या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आणि तो म्हणजे  उपकर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याच्या माघारीचा... दुखापतीतून अद्यापही न सावरलेल्या लोकेशला इंग्लंड दौऱ्यावर न पाठवण्याचा निर्णय BCCI ने घेतला आणि त्याला उपचारासाठी जर्मनीत पाठवणार असल्याचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले. पण, भारतीय चाहत्यांची चिंता इथेच कमी झालेली नाही, तर BCCI ने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये कर्णधार रोहित शर्माच ( Rohit Sharma) दिसत नसल्याने चाहत्यांची धाकधुक वाढलीय. 


बीसीसीआयने ट्विट केलेल्या फोटोंत विराट कोहली, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, चेतेश्वर पुजारा, प्रसिद्ध कृष्णा, शुबमन गिल, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आदी खेळाडू दिसत आहेत. पण, रोहित नसल्याने चिंता वाढली आहे. आयपीएल २०२२नंतर रोहित, विराट व जसप्रीत हे विश्रांतीवर होते. त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत विश्रांती दिली होती. त्यानंतर रोहित व विराट कुटुंबियांसह परदेशात फिरायलाही गेले होते. विराट मायदेशात परतला व आता टीम इंडियासोबत लंडनमध्येही दाखल झाला.

पण, रोहित संघासोबत का गेला नाही, हा प्रश्न सर्वांना सतावतोय. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार रोहित १७ जूनला लंडनसाठी रवाना होणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व रिषभ पंत २० जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होतील. काही मीडियांच्या मते रोहित २० तारखेला द्रविड व रिषभ यांच्यासहच रवाना होणार आहे. 

भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक

  • चार दिवसीय सराव सामना वि. लेइसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब - २४ ते २७ जून  
  • भारत अ वि. डर्बिशायर ट्वेंटी-२० - १ जुलै  
  • पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन

 
इंग्लंडविरुद्धच्या  सामन्यासाठी भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, के एस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा
 

Web Title: India Tour of England : Rohit Sharma will be leaving for England on early 17th June morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.