India Tour of England : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय खेळाडू लंडनमध्ये पोहोचले आहेत. बीसीसीआयने खेळाडूंचे फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. पण, या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आणि तो म्हणजे उपकर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याच्या माघारीचा... दुखापतीतून अद्यापही न सावरलेल्या लोकेशला इंग्लंड दौऱ्यावर न पाठवण्याचा निर्णय BCCI ने घेतला आणि त्याला उपचारासाठी जर्मनीत पाठवणार असल्याचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले. पण, भारतीय चाहत्यांची चिंता इथेच कमी झालेली नाही, तर BCCI ने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये कर्णधार रोहित शर्माच ( Rohit Sharma) दिसत नसल्याने चाहत्यांची धाकधुक वाढलीय.
पण, रोहित संघासोबत का गेला नाही, हा प्रश्न सर्वांना सतावतोय. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार रोहित १७ जूनला लंडनसाठी रवाना होणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व रिषभ पंत २० जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होतील. काही मीडियांच्या मते रोहित २० तारखेला द्रविड व रिषभ यांच्यासहच रवाना होणार आहे.
भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक
- चार दिवसीय सराव सामना वि. लेइसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब - २४ ते २७ जून
- भारत अ वि. डर्बिशायर ट्वेंटी-२० - १ जुलै
- पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, के एस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा