Join us  

India Tour of England : विराट कोहलीचा कोरोना रिपोर्ट आलेला पॉझिटिव्ह, पण...!; पाचव्या कसोटीवर संकट

India Tour of England : भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे आणि खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 11:25 AM

Open in App

India Tour of England : भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे आणि खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे.  1 जुलैपासून सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटीपूर्वी भारतीय खेळाडू 24 जूनपासून चार दिवसीय सराव सामना खेळणार आहेत. पण,  भारत-इंग्लंड कसोटीवर कोरोनाचं संकट येताना दिसतंय...इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी फिरकीपटू आर अश्विन याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्याला सहकाऱ्यांसोबत लंडनला जाता आले नाही. तो आज किंवा उद्या लंडनमध्ये दाखल होईल असे सांगण्यात येतेय... TOI ने दिलेल्या वृत्तानुसार भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.  इंडियन प्रीमिअर लीग 2022 नंतर विश्रांतीवर असलेला विराट पत्नी अनुष्का शर्मासोबत मालदिवला फिरायला गेला होता. त्यानंतर लंडनसाठी संघासोबत रवाना झाला. लंडनमध्ये दाखल झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त TOI ने प्रसिद्ध केले आहे. मालदिवहून परतल्यानंतर विराट मुंबईतील हॉस्पिटलमध्ये गेल्याचे वृत्त दिले होते. ''होय, मालदिवहून परतल्यानंतर विराट कोहलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, परंतु तो त्यातून पुर्णपणे बरा झाला आहे,''असे TOIला सूत्रांनी सांगितले. 

इंग्लंड क्रिकेट संघाचा फलंदाज प्रशिक्षक मार्कस ट्रेस्कोटिक याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाने सांगितले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यालाही बरं वाटत नाही. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, परंतु त्यानं काल सराव सत्रात सहभाग घेतला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत स्टोक्स खेळण्याची शक्यता कमी असल्याचे स्थानिक मीडियाकडून वर्तवण्यात येत आहे. 

लंडनला दाखल झाल्यानंतर विराट, रोहित शर्मा हे फॅन्ससोबत फोटो काढताना दिसले होते. लंडनमधील कोरोना परिस्थिती ठिकठाक असली तरी खेळाडूंना काळजी घेण्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. काल लंडनमध्ये 10 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत.   

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीकोरोना वायरस बातम्या
Open in App